जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल, तामलवाडी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर :मा. पोलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने व अपर पो अधीक्षक श्री नवनीत कावत यांचे मार्गदर्शनाखाली तामलवाडी पो ठाणे हद्धित अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करणे कामी दिनांक 21 रोजी शुक्रवार रोजी सायंकाळी 18.00 वा चे सुमारास तामलवाडी पो ठाणे हद्दीतील सुरतगाव ते पिंपळा जाणारे रोड वर एका पिक अप वाहनामध्ये मधे क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात अवैध रित्या जनावरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती तामलवाडी पो ठाणे चे सहायक पोलिस निरीक्षक श्री सुशील चव्हाण यांना मिळाली असता सदर मिळाले बातमी वरून तामलवाडी पो ठाणे कडील पथकाने सापळा लावून कारवाई केली.
एक पिक अप वाहन क्रमांक MH 25 P 4931मध्ये जनावराची चारा पाण्याची सोय न करता निर्दयीपणे वाहतूक करताना तुळ्जापुर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरतगाव ते पिंपला जाणारे रोड वर शुक्रवारी आढळुन आला. सदर अशोक लिलॅड कंपनीच्या पिक अप वाहणामध्ये चार संकरीत व खिलार जातीचे खोंडे ही क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरून वाहतूक करताना आढळुन आले. या प्रकरणी रोहीत राजेन्द्र बागल रा सांगवी मार्डी ता.तुळजापुर यानी दिलेल्या फिर्यादी वरून सदर पिक अप वाहन क्र MH 25 P 4931 चा चालक आरिफ हुसेन कुरेशी रा. काटी ता. तुळजापुर याचे विरुध्द महाराष्ट्र प्राणी अधिनियम कलम 5, 5(अ),5(ब)सह मोटार वाहन कायदा कलम 83,177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामलवाडी पोलीसांनी सदर चार जनावरे ताब्यात घेऊन पिक अप वाहनासह असा एकूण 2,19,000/- रुपये चा माल जप्त केला आहे. सदरची कामगिरी मा.पोलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक श्री नवनीत कांवत यांचे मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि सुशिल चव्हाण ,बिट अमलदार संजय राठोड,पो शिपाई सुरज नरवडे ,राजेन्द्र चौगुले यांनी केली आहे.
0 Comments