तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(शरद पवार) गटाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न,बैठकीस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर : येथील शासकीय विश्रामगृहात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक दि, २३ रोजी घेण्यात आली,नवीन पदाधिकारी निवड शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची बैठक ,तसेच पक्ष ताकद वाढीसाठी गण वॉईज गट वाईज बैठक घेणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका साठी तुळजापूर शहरामधील नगर परिषदेचे चे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणून भविष्यात आमदारकीसाठी पक्षाकडे ही जागा कशी सोडवली जाईल या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी एस टी महामंडळ अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, अनिल शिंदे, तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, महेश कदम, रुबाब पठाण, बाबा काशीद, चांद पाशा, सुरेश पाटील दहिवडीकर, दिलीप मगर,अनिल शिंदे नेताजी पाटील, उत्तम लोमटे, संजय दुरगुडे, दिनकर पवार,शहराध्यक्ष अमर चोपदार, मकसूद शेख, गोरख पवार,युवक तालुका अध्यक्ष संदीप गंगणे, तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे, राजकुमार बोबडे, विवेक शिंदे, गणेश नन्नवरे, तोफिक शेख, अक्षय परमेश्वर, अशोक जाधव,गजानन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments