Hot Posts

6/recent/ticker-posts

टाटा सामाजिक विज्ञान संस्था, व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मियावॉकी घनवनामध्ये भव्य वृक्षारोपण

टाटा सामाजिक विज्ञान संस्था, व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मियावॉकी घनवनामध्ये भव्य वृक्षारोपण

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद 

तुळजापुर : टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर व सामाजिक वनीकरण विभाग, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मियावॉकी घनवनामध्ये दि,२२ रोजी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या वृक्षरोपण कार्यक्रमला उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक, मा. श्री. अतुल कुलकर्णी, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर उप संचालक प्रो.रमेश जारे, विभागीय वनधिकारी, आर.आर. चोबे, आर एफओ पंचरंडे, टाटाचे गणेश चादरे, डॉ. संपत काळे, डॉ श्रीधर सांमत, राम राठोड, आनंद भालेराव, शंकर ठाकरे, आरओ शहाजी देशमुख, ऋषभ चौधरी, कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.दयानंद वाघमारे, टाटाचे विद्यार्थी, कर्मचारी सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मियावॉकी मध्ये  फळांची, फुलांची,वनौषधी वदुमिाळ अशा देशी प्रजातीच्या 13,200 वृक्षांची लागवड म्हणजे मानवाबरोबरच निसर्गातील पशुपक्षी, वन्यप्राणी व जीवजुतू यांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बरोबरच सर्वच घटक या वनामध्ये असल्यामुळे हे घनवन सर्वासाठी जीवनदायनी असल्याचे अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रसंगी, प्रो.रमेश जारे म्हणाले की. नवीन शैक्षणिक धोरण 2020मध्ये प्रामुख्याने पर्यावरणसंवर्धन या विषयाला महत्वपूर्ण स्थान  प्राप्त झाले आहे. टिस हे पहिले विद्यापीठ आहे. ज्यांनी सर्वांत प्रथम मियावॉकी घनवनउभारणी केली आहे.

या प्रसंगी संपत काळे म्हणाले की,पर्यावरण अभ्यासासाठी विद्यार्थ्याना हे मियावॉकी घनवन मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी, श्री. गणेश चादरे म्हणाले की, निर्सग हा आपल्या सर्वाचाच आहे व आपण सर्वजन निसर्गाचे आहोत. त्यामुळे प्रत्येकांनी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.वृक्ष लागवडी बरोबरच त्याचे योग्य संवर्धन करण्यासाइी विद्यार्थ्याना वृक्ष दत्तक देण्यात येणार आहेत. प्रत्येक वृक्षाला विद्यार्थ्याचे नाव देण्यात येणार आहे. वृक्ष लागवड व संवर्धन स्पर्धा अंतर्गत जो विद्यार्थी आपल्या झाडाचे योग्य संगोपन करेल त्याला प्रमाणपत्र देवून त्याचा सन्मान ही करण्यात योणार असल्याचे बणेश चादरे यांनी सांगितले व सामाजिक वनीकरण विभागाने मियावॉकी घनवन करण्यासाठी टाटा संस्थेची निवड केल्याबद्दलत्यांचे व याकार्यक्रमामध्ये बालाजी आमईन्सचे हे मोलाचे योगदान असल्याबद्दल त्यांचे ही आभार व्यक्त केले.


 याप्रसंगी, ग्रीनयात्री संस्था मुंबईचे मियावॉकी तज्ञ ऋषभ चौधरी यांनी ही वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले. या प्रसंगी जेष्ठसामाजिक कार्यकर्ते राम राठोड यांनी पर्यावरण विषयक घोषणा देवून विद्यार्थ्यामध्ये  नव चेतना निर्माण केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टाटाचे गणेश चादरे, आनंद भालेराव शंकर ठाकरे, सर्व विद्यार्थ्यी सामाजिक वनीकरण विभागाचे शहाजी देशमुख व त्याच्या सर्वच कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments