Hot Posts

6/recent/ticker-posts

शिंगोली येथील ग्रामस्थांचे राष्ट्रीय महामार्गा वरील उड्डाण पुलाच्याच्या दोन्ही बाजूचे पथदिवे बसविण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको.

शिंगोली येथील ग्रामस्थांचे राष्ट्रीय  महामार्गा वरील उड्डाण पुलाच्याच्या दोन्ही बाजूचे पथदिवे बसविण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको.

धाराशिव दि. ११ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  ५२ वरील शिंगोली गावालगत असलेल्या दोन्ही बाजूच्या ब्रिजवरील लाईट व सर्किट हाऊस समोरील चौकात हायमस्ट बसवण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला आहे.

शिंगोली येथील गावालगत असलेल्या महार्गावरील उपळा पाटी पुलावर व MIDC पुलावर लाईट नसल्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहने, पादचारी लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लगत आहे. तसेच लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी ब्रिजवर लाईट नसल्यामुळे अंधाराचा गैरफायदा घेवून चोरटे दबा धरून बसत आहेत व आजपर्यंत अशा प्रकारे अनेक चोऱ्या या मागील काही महिन्यामध्ये घडल्या आहेत.

तसेच गावालगत असलेल्या सर्किट हाउस समोरील महामार्गावरील चौकातही लाईट नाही. या चौकाला मौजे शिंगोली येथील गावाचा व MIDC मधील रस्ता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्राचा रस्ता जोडलेला आहे. त्यामुळे या चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी आहे. या ठिकाणी लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी सतत लहान मोठे अपघात घडत आहेत व त्यामध्ये आजपर्यंत भरपुर जीवित हानी झालेली आहे.तरी वरील दोन्ही ठिकाणावरील ब्रिजवर लाईट व सर्किट हाउस समोरील चौकात हायमस्ट लॅम्प पुढील १५ दिवसात बसवून मिळावे जर पुढील १५ दिवसात लाईट बसविले नाही तर सर्किट हाउस समोरील महामार्गावरील चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी भाजपा युवा मोर्चा  जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, उपसरपंच  ॲड, मनोज मगर ग्रामपंचायत सदस्य रत्नदीप पडवळ, गणपत मगर, राजू राठोड, जहांगीर शेख, रमेश वाघमारे, रामदास आडे, सचिन वाघमारे, तुराब शेख , शिवाजी चव्हाण, प्रवीण शिंदे , प्रशांत शिंदे , समाधान शितोळे, प्रवीण शितोळे, प्रसाद शिंदे, भगवान महाळांगी, वैकुटे, संजय यलगिरे, खारगे, उत्तम चव्हाण, पप्पू वाघमारे, तनपुरे, सागर शिंदे आदी  ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments