Hot Posts

6/recent/ticker-posts

सुमेध फाउंडेशनने दिला नेताजी हायस्कूलच्या गरजु विद्यार्थ्यांना मदतीचा हात.

सुमेध फाउंडेशनने दिला नेताजी हायस्कूलच्या गरजु विद्यार्थ्यांना मदतीचा हात.

प्रतिनिधी रुपेश डोलारे सोलापुर .


सोलापुर : नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल मध्ये सुमेध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने  हायस्कूलच्या 125 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री दिलीप स्वामी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,सोलापूर हे उपस्थित होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार सर होते, व्यासपीठावर सुमेध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मा डॉ जानवी माखीजा , 

युकता माखीजा, श्रीदेवीदास मेढे, श्री सुनील दावडा, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रविशंकर कुंभार सर माजी मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले सर पर्यवेक्षक श्री गौरीशंकर आळंगे सर, आदि उपस्थित होते, 

आपले मनोगत व्यक्त करताना डॉ माखीजा यांनी विद्यार्थ्यांना भरपूर कष्ट करा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही, प्रत्येक पावली तुमच्या मदतीसाठी मी हजर आहे असे आश्वासन दिले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुमेध फौंडेशनच्या दातृत्वगुणाचे कौतुक केले, विद्यार्थ्यांनी टीव्ही मोबाईल व सोशल मीडिया यांच्यापासून दूर राहून आपले करिअर घडवण्याकडे लक्ष द्यावे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे त्यांचा आदर करावा असे मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अण्णाराव कुंभार यांनी डॉक्टर माखिजा व सुमेध फाउंडेशन यांच्यासारखे दातृत्व संपन्न व्यक्तिमत्व समाजात असतील तर गोरगरीब कामगार वस्तीतील मुले शिक्षण क्षेत्रात नक्कीच नावलौकिक करतील असे सांगून, मुख्य कार्याधिकारी दिलीप स्वामी यांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे कौतुक करत सर्व शाळांना हा कार्यक्रम राबवण्यासाठी आवाहन केले.या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य डॉ.श्रीकांत अंजुटगी सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेत सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद स्काऊट गाईड चे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विश्वराध्य मठपती सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments