Hot Posts

6/recent/ticker-posts

भवानीनगर येथे अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्सव उत्साहात संपन्न महिलांची उल्लेखनीय उपस्थिती धनगर आरक्षण दाबून ठेवण्याचे पाप कोणी केले - ऍड . अण्णाराव पाटील

भवानीनगर येथे अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्सव उत्साहात संपन्न महिलांची उल्लेखनीय उपस्थिती
धनगर आरक्षण दाबून ठेवण्याचे पाप कोणी केले - ऍड . अण्णाराव पाटील 
बहुजन समाजाला डावलण्याचे कारस्थान या राजकारण्यांचेच - मा.धनराज वंजारी 
भाजपा व राष्ट्रवादी यांची धनगर आरक्षण बाबत छुपी युतीचे राजकारण - कल्याणी वाघमोडे .



भवानीनगर /बारामती :अहिल्याक्रांती महिला विकास प्रतिष्ठान प्रेरित क्रांती शौर्य सेना तर्फे छत्रपती सह.साखर कारखाना,भवानीनगर  येथे  आयोजित करण्यात आलेला  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९८ वा  जयंती महोत्सव उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी केले होते .


प्रमुख वक्ते व मार्गदर्शक माजी पोलीस आयुक्त व   आम आदमी पक्षीचे मा. धनराज वंजारी  आणि कार्यक्रम अध्यक्ष मा.महाराष्ट्र विकास आघाडी चे अॅ ड. आण्णाराव पाटील यांचे   मनोगत मधून मोलाचे मार्गदर्शन लाभले .

उदघाटक व सत्कारमूर्ती म्हणून भारतीय बेसबॅाल संघाची कर्णधार मा.रेश्मा पुणेकर व बारामतीच्या  नायब तहसीलदार भक्ती देवकाते या महिला होत्या .


यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व वृक्षारोपण करून कार्यक्रम सुरवात झाली. गझी ढोल नृत्य ने कार्यक्रम मधे चार चांद लावले .आणि कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल  सर्व महिला भगिनी व प्रतिष्ठान चे मान्यवर यांनी कौतुक केले . 


प्रास्ताविक क्रांती शौर्य सेना व प्रतिष्ठान च्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी केले .यावेळी जयंती उत्सव चे ९ वे वर्ष असल्याने आनंद व्यक्त करत सर्व बंधू भगिनी चे आभार व्यक्त केले .

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम प्रशासक म्हणून १८ व्या शतकात लोकाभिमुख कार्य केले .अहिल्यादेवी होळकर  यांच्या विचारांचा आदर्श आजच्या राजकीय लोकांनी घ्यावा .असे मत व्यक्त करत महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या अस्थिर राजकारणावर टीका केली . धनगर आरक्षण वरून भाजपा व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष पुढे एक आणि पडद्या मागे एक असे वागतात ,मतांच्या भांडवला साठी धनगर ,ओबीसी चा वापर केला जातो हि शोकांतिका व्यक्त केली आणि उमेदवारी नाही तर मतदान नाही असा पण ओबीसी नी करावा असे आवाहन कल्याणी वाघमोडे यांनी केले .



यावेळी आम आदमी पक्षाचे धनराज वंजारी स यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत आज  ओबीसी ,बहुजन यांना डावलून खालील पातळी वर राजकारण केले ,असे परखड मत व्यक्त केले .अध्यक्ष भाषण महाराष्ट्र विकास आघाडी चे अध्यक्ष व महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य  ऍड .अण्णाराव पाटील यांनी केले .यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देत होळकराचा गौरवशाली इतिहास उजागर केला .महिलांना समान वागणूक देऊन सन्मान करावा ,असे आवाहन त्यांनी केले . तसेच  धनगर व ओबीसी ,सर्व बहुजन यांना सामाजिक ,आर्थिक ,राजकीय विकासच्या वाटे पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करत आहेत .परंतु सर्वांनी एकत्र येऊन काम करत विकास करणे गरजेचे आहे,असे मत व्यक्त केले .लोकसभा मधे पास झालेले 1967 चे बिल राष्ट्रपती कडे सहीला न पाठवता दाबून ठेवण्याचे पाप कोणी केले अशी टीका नाव न घेता बारामतीच्या नेत्यावर केली .

तसेच धनगर आरक्षण वरून सुरु असलेल्या उच्च  न्यायालयमधील याचिका बाबत सविस्तर स्पष्टोक्ती करत धनगर समाजाला कोर्टातून न्याय मिळेल ,असे आश्वासन देत समाजाला आशा दिली .  


या  कार्यक्रमांमध्ये  कला ,क्रीडा ,साहित्य,खेळ ,दहावी ,बारावी ,स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा सत्कारमूर्ती म्हणून सन्मान करण्यात आला . यावेळी महिलांसाठी आयोजित मनोरंजक खेळातून खास पैठणी सौ.शैला विनोद पांढरे यांनी जिंकली .



सद्गुरू सा.का .राजेवाडी चे व्हा .चेअरमन बाळासाहेब कर्णवर ,  छत्रपती कारखाना चे व्हा .चेअरमन बाळासाहेब पाटील ,बारामती मार्केट कमिटी संचालक शुभम ठोंबरे ,ऍड येचाळे,फलटण नगरपरिषद च्या मा.नगरसेविका वैशाली चोरमले ,सरपंच सीमा ठोंबरे , उदयोजक  प्रकाश नेवसे ,अमोल भोईटे ,पोपट घुले ,प्रकाश देवकाते , सामाजिक कार्यकर्त्या मंजुळा रूपनवर , आशा रूपनवर ,सरपंच बाळासाहेब जोशी ,आस्था टाइम्स चे संपादक कृष्णाथ चोरमले ,माजी सरपंच पोपट टकले, रासपाचे ऍड ,दिलीप धायगुडे, चंद्रकांत वाघमोडे ,ऍड .राजेंद्र मासाळ ,गणेश चोरमले , शिवाजी लकडे , विजया पिंगळे, सदस्य सुनीता टकले  आदी सह ,सरपंच ,सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .



महाराष्ट्रभर अनेक जयंती उत्सवात गेलो पण अश्या पद्धतीने उत्साहात साजरा होणारा महिला नियोजित जयंती उत्सव प्रथमच पाहिला  असा उल्लेख करून मान्यवर यांनी आयोजक कल्याणी वाघमोडे यांचे कार्याचे समर्थन करत शुभेच्छा दिल्या .


तसेच महाराष्ट्र मधे राजकीय भूकंप झालेला असताना देखील मोठ्या संख्येने नागरिक ,बंधू भगिनी उपस्थित राहून कार्यक्रम शोभा वाढवली .त्याबद्दल प्रतिष्ठान च्या वतीने मनःपूर्वक आभार डॉ.सुजित वाघमोडे यांनी व्यक्त केले .

सूत्रसंचालन कुमार देवकाते व अनिल रूपनवर यांनी केले .

Post a Comment

0 Comments