पोलीस अधीक्षक मा.श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन उस्मानाबाद जिल्ह्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्या 50 शेतकऱ्यांना ऑरगॅनिक पासपोर्ट वितरण.
धाराशिव : पोलीस अधिक्षक मा. श्री अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेती उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑरगॅनिक पासपोर्ट चे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री श्री तानाजी सावंत यांचे हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात वितरीत करण्यात आले.
ऑरगॅनिक पासपोर्ट ही संकल्पना परदेशी भ्रमंती साठी लागणारे “पासपोर्ट” या संकल्पनेवर आधारित असुन याद्वारे सेंद्रीय शेती करणारे शेतकऱ्यांचे शेताची व त्यांचे सेंद्रीय उत्पादनाची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेली विविध सेंद्रीय उत्पादने ही “नॅशनल प्रोग्राम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्ट” या केंद्र सरकारच्या कार्यक्रमा अंतर्गत ठरविलेले विविध कामगिरी निर्देशांक व निकषा नुसार आहे किंवा नाही याची माहिती या पासपोर्ट व्दारे उपलब्ध होणार आहे. याचा फायदा सदरील शेतकऱ्यांना आपले सेंद्रीय उत्पादनाचे विपणन करण्यासाठी व मालाची परदेशात निर्यात करण्यासाठी होणार आहे. तसेच ग्राहकांना सदर ऑरगॅनिक पासपोर्ट द्वारे सेंद्रीय उत्पादनाच्या दर्जाची व विश्वासार्हतेची खात्री करुन ते विकत घेण्यासाठी होणार आहे. सदरची संकल्पना ही मा. पोली अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्ग दर्शनाखली उस्मानाबाद जिल्हा पेालीस दल व जिल्हा कृषी विभाग, उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने सेंद्रीय शेती तज्ञ श्री. अभिलाष गोरे यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. आज एकुण 50 शेतकऱ्यांना ऑरगॅनिक पासपोर्ट चे वितरण करण्यात आले असुन नजिकच्या काळात सन 2024 पर्यंत जिल्ह्यातील 1000 शेतकऱ्यांना ऑरगॅनिक पासपोर्ट वितरीत करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे मा. जिल्हा पोलीस प्रमुख श्री. अतुल कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
सदरचा कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. तानाजी सावंत, जिल्हाधिकारी श्री. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, जिल्हा कृषी अधिकारी आणि कृषी विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी, तसेच जिल्ह्यातील इतर शासकिय विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments