Hot Posts

6/recent/ticker-posts

मुस्लिम दफनभूमीसाठी सात एकर जागा देण्याचे पालकमंत्री सावंत यांचे आदेश

मुस्लिम दफनभूमीसाठी सात एकर जागा देण्याचे पालकमंत्री सावंत यांचे आदेश
प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव 


उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील मुस्लिम समाज दफनभूमीसाठी सात एकर जागा देण्याची मागणी समस्त उस्मानाबाद करांच्या वतीने करण्यात आली होती. यासाठी सातत्याने पालकमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्याकडे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे व मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ पाठपुरावा करत होते.  

मुस्लिम समाजाच्या वतीने आज दि 15 ऑगस्ट 2023 रोजी पालकमंत्री सावंत यांची शिवसेना अनिल खोचरे यांनी मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळातील मसुद शेख, कादर खान, आयाज शेख, बाबा मुजावर, अनवर शेख, वाजिद पठाण, अफरोज पिरजादे, असद पठाण, बिलाल तांबोळी, एजाज काझी, मुजीब काझी, अतिक शेख, पैगंबर भाई, रसूल भाई , गयाज मुल्ला , खलिफा कुरेशी इत्यादी भेट घेऊन पुन्हा मुस्लिम समाजासाठी सात एकर जागेची मागणी करण्यात आली पालकमंत्री यांनी जागेवर निर्णय घेत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाला मुस्लिम समाजासाठी सात एकर जागा चार दिवसाच्या आत मध्ये योग्य निर्णय घेऊन देण्याचे आदेश दिले आहेत.

उस्मानाबाद शहरालगतची सर्वे नंबर 426 मधील सात एकर जागा देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांनी केली होती‌. कब्रस्तान दफनभूमीसाठी पालकमंत्री यांनी प्रशासनाला आदेश दिल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत व शिवसेनेचे अनिल खोचरे , शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, अजित लाकाड व जिल्हाधिकारी , जिल्हा प्रशासनाचे मुस्लिम समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments