उस्मानाबाद जिल्हा मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती वाटेगावात साजरी
उस्मानाबाद (प्रतिनिधी) सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे उस्मानाबाद जिल्हा मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने १ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०३व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जन्म गावी वाटेगाव येथे जयंती उत्साहात साजरी करुन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या वेळी मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे,युवक जिल्हाध्यक्ष किरण भाऊ कांबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रघुनाथ भाऊ पाटोळे,सिंदफळचे शाखाध्यक्ष तानाजी कांबळे, मानवहित लोकशाही पक्षाचे शहर अध्यक्ष सदाशिव शिंदे,वाशी तालुका महीला अध्यक्षा आशाताई शिंदे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी अण्णाभाऊ साठे यांचे नातु तथा मानवहित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या घरास भेट देऊन अभिवादन करण्यात आले.तर यांच्या जिवन चरीत्रावर आधारीत शिलपसॄष्टिस साकारली आहे,त्यास भेट देण्यात आली.
0 Comments