Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर नगरपरिषदतर्फे ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान

तुळजापूर नगरपरिषदतर्फे ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव


तुळजापुर: तुळजापूर नगर परिषदेतर्फे दि,९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या दरम्यान स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश हे अभियान राबवले जाणार आहे तरी या अभियानामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा अशा नगर परिषदे कडून आवाहन करण्यात आले आहे.

मेरी माटी मेरा देश या अभियानामध्ये दि,१० रोजी सकाळी ११ वाजता वसुंधरा वंदन( अमृतवाटिकेसाठी देशी प्रजातीच्या ७५ वृक्षांची लागवड)  या कार्यक्रमाचे ठिकाण नळदुर्ग रोड तुळजापूर नगरपरिषद जल शुद्धीकरण केंद्र तुळजापूर येथे असणार आहे,दि,११ रोजी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम,९.१५ वाजता पंचप्रण शपथ घेणे, तसेच ९.२० वाजता स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन हे सर्व कार्यक्रम नगरपरिषद कार्यालय तुळजापूर येथे होणार आहे, तसेच दिनांक १४ रोजी सकाळी ११ वाजता शीला फलक उभारणी, कार्यक्रम नगरपरिषद शाळा क्र.३ तुळजापूर खुर्द येथे होणार आहे. तसेच दिनांक १६ ते २० या कालावधीमध्ये माती कलश( तुळजापूर शहरातील एक मुठ माती सदर कलशामध्ये जमा करावी) या कार्यक्रमाचे ठिकाण नगरपरिषद कार्यालय तुळजापूर येथे आहे.

तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत गतवर्षीप्रमाणे याही वर्षी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सर्व नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्यात यावा. तिरंगा ध्वज नगरपरिषद कार्यालय तुळजापूर येथे उपलब्ध आहेत.


Post a Comment

0 Comments