प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई के वायसी करा व पीएम किसान१४ वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी हप्ता चालू ठेवा : सतीश कचरे मंडळ कृषि अधिकारी
नातेपुते /प्रतिनिधी : शेतकरी राज्याला बियाणे व खते खरेदीसाठी इतर शेती कामासाठी १४ वा पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी १ला हप्ता चालू ठेवणेसाठी पीएफ किसान लाभधारक कुटूब सदस्याने ई केवायसी अद्द्यातन साठी पीएम किसान पोर्टलवर बेनीफिसरी स्टॅटस मधून ईकेवायसी झाले की नाही लॅन्ड सेडीग आहे किं नाही व आधार बॅकला लिंक आहे की नाही हे तपासणी करून खालील बाबीची पूर्तता करणे अनिवार्य आहे. जेणेकरून पात्र शेतकरी बांधव वंचीत राहणार नाहीत . !! १ - लॅड सेडीग अपूर्ण असेल तर मा तहसिलदार यांचे मदतीने राज्याच्या भुमि अभिलेख नोंदीप्रमाणे आवश्यक कागदपत्रे आधारे नोंदी अद्ययावत करणे २- ईकेवायसी प्रलंबीत असेल तर पीएम किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नर मधील ईकेवायसी लिंक किंवा ईकेवायसी टॅब वर मोबाईल द्वारे पीएम किसान ४ अंकी व आधार ६ अंकीओटीपी आधारे सुविधेद्वारे ई केवायसी प्रमाणीकरण करणे ३ - किंवा समाईक सुविधा केंद्रामार्फत सीएससी सेंटरवर ईकेवायसी करणे ४-किवा केंद्रशासनाच्या पीएफ किसान अँप द्वारे फेस डिटेक्शन द्वारे ई केवायसी अद्यायातन करणे त्यासाठी किसान पोर्टलWWW.PMKISAN.GOV.IN या संकेत स्थळाचा वापर करावा . ५ - बॅकेत जाऊन बॅक खात्यात आधार सलग्न करून ६-किंवा पोस्टमास्टर यांचे मार्फत पेमेन्ट बॅक खाते उघडावे वरील आत्यावश्यक ३बाबीची पूर्तता केल्यानंतर पो एम किसान १४ वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी १ ला हप्ता ऑनलाईन जमा होणार आहे यांची शेतकरी बांधवांनी नोंद घेणे गरजेचे आहे. ७- मोबाईल नंबर आधारला लिंक नसेल तर पीएम किसान गोल अँप द्वारे फेस डिटेक्शन सुविधी द्वारे ई केवायसी करणेसाठी खालील सुचनाचा वापर व पालन करावे . पीएम किसान पोर्टल किंवा गुगल पे स्टोअर किंवा प्ले स्टोअर वरून पीएम किसान गोल २.० हे अँप व फेस RD ॲप डाऊनलोड करणे अगोदर पूर्वीचे अँप काढून टाकून ही नवीन अँप डाऊनलोड करावे व खालील सुचनांचे पालन करून ई केवायसी करावी .
नवीन पीएम किसान गोल २.० अँप मध्ये भाषा निवड करून पीए किसान नोंदणीकृत लाभार्थीनी लॉगीन करून आधार क्रमांक किंवा पीएम किसान नोंदणी क्रमांक टाकून बेनीफीसरी पर्याय निवड करून ओटीपी नोंदणीकृत मोबाईल वर प्रात्त करुन ओटीपी आधारे सहा अंकी एमपीन च्या माध्यमातून लॉगीन करून युवर केवायसी प्रलंबीत असा संदेश असेल तर ई केवायसी पूर्ण करणेसाठी ईकेवायसी क्लीक करून एमपीन च्या आधारे तदनतर कन्सेट फॉर्म वर क्लिक करुन स्कॅन फेस क्लीक करून मोबाईल चेहऱ्यावर प्रकाश दिसेल असा धरून स्कॅन फेस बटन क्लीक करून ईकेवायसी यशस्वी रित्या पूर्ण झाले बाबत संदेश येईल तो पर्यंत अँप सुचनांचे पालन करून ईकेवायसी करावी . ८- इतर नोंदणीकृत नसलेल्या लाभार्थींना ई केवायसी करावयांची असेल तर ईकेवायसी फॉर ऑदर बेनिफिसरी चा वापरून वरील कार्यपद्धती व सुचनांच पालन करून ई केवायसी करून १४ व्या सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी चा १ ला हप्ता वेळेवर प्राप्त करून घेणेचे अहवान मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यालयाने केले आहे.
९-पीएम किसानhttps://pmkisan.com_ekyctab_adhar no_add adhar link mobile_4 अंकी ओटी पी - सबमिट - 6 अंकी ओटीपी- सबमिट - ई केवायसी सक्सेसफुली डन मेसेज येतो व ई केवायसी पूर्ण होते . आधार नंबर व बॅक खाते नं ला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे हे पाहणेसाठी http:// udyam Registration gov .in / udam Registration .aspx वर आधार नंबर व आधार वर आहे तसेच नाव टाकून कोणता मोबाईल नंबर validate and Generate otp ने लिंक मोबाईल चे शेवटचे चा ४ अंक समजतात त्यावरून मोबाईल नंबर कळून येतो .अधिक माहिती कार्यपद्धती सुचना शंका निरासण व अँड्राईड मोबाईल नसलेल्या शेतकरी बंधूनी नजीकच्या कृषि विभाग ऑफीस अधिकारी कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा असे मंडल कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
0 Comments