Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी मुख्याध्यापक व शालेय कमिटीच्यावतीने उपसरपंच श्री राम कदम यांचा सत्कार

जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा चव्हाणवाडी मुख्याध्यापक व शालेय कमिटीच्यावतीने उपसरपंच श्री राम कदम यांचा सत्कार 
 तुळजापुर : तालुक्यातील चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे १५ ऑगस्ट  स्वातंत्र्य दिनानिमित्ताने औचित्य साधून चव्हाणवाडी/ धनगरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच राम श्रीमंत कदम यांचा सत्कार करण्यात आला. १९९४ साली स्थापना होऊन आज पर्यन्त २८ वर्ष शाळेला विजपुरवठा नव्हता. त्यासाठी  शाळेला विजपुरठा मंजूर करण्यासाठी शासन दरबारी विशेष प्रयत्न करुन उपसरपंच राम श्रीमंत कदम यांनी शाळेसाठी ८ पोलचे काम मंजुर करुन घेऊन यशस्वीरित्या काम पुर्ण करुन घेऊन विजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला व ग्रामपंचायतच्या वतीने पाणी फिल्टरही उपलब्ध करुन देण्यात आल्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री साखरे सर शालेय कमिटी अध्यक्ष  तुकाराम भास्कर चव्हाण यांच्या वतीने उपसरपंच श्री राम श्रीमंत कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी शालेय कमिटी अपाध्यक्ष राजकुमार चव्हाण अंगणवाडी सेविका कौशल्या चव्हाण गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री बाबुराव चव्हाण, बळीराम कदम, राम चव्हाण, मल्हारी देडे, महादेव चव्हाण, विनोद चव्हाण व ग्रामस्त युवक वर्ग, महिला,विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments