तुळजाभवानी कामगार संघटना, महाराष्ट राज्य, संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांचे विविध मागण्यासाठी मा.तानाजीराव सावंत आरोग्यमंञी तथा पालकमंत्री धाराशिव यांना निवेदन
प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव
धाराशिव: तुळजाभवानी कामगार संघटना, महाराष्ट राज्य, संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांचे विविध मागण्यासाठी मा तानाजीराव सावंत आरोग्य तथा पालकमंत्री उस्मानाबाद यांना आज दि १५ रोजी निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील विनाअनुदानित जीएनएम, एएनएम विद्यालयात प्रवेशित अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक व इतर फिसच्या सवलतीप्रमाणे विमुक्त जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही ही सवलत त्वरीत मिळवुन देते बाबत निवेदनामध्ये मागणी केली आहे.या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड पॅरामेडीकल अॅण्ड नर्सिंग टेक्नीकल एज्युकेशन (MSBNTE) अंतर्गत विनाअनुदानीत जीएनएम आणि एएनएम हे नर्सिंगचे कॉलेज, कोर्सेस चालविले जातात. या कोर्सेसमुळे ग्रामीण स्तरावर शासकीय, निमशासकीय, खाजगी विभागात मोठया प्रमाणामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध असल्यामुळे बहुतांश प्रमाणात या कोर्सेसला प्रवेश घेणाऱ्यामध्ये मुलींची संख्या नगण्य आहे.
सदरच्या कोर्सेसला सन 2012 पर्यंत प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शिष्यवृत्तीच्या स्वरुपात शैक्षणिक सवलत मिळत होती. परंतु शैक्षणिक वर्ष 2012 च्या नंतर अनुसुचित जाती आणि जमाती हे प्रवर्ग वगळता विमुक्त जाती, जमाती इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याला मिळावयाची शैक्षणिक फीसची सवलत बंद झाल्यामुळे ग्रामीण सदल गोरगरीब मुले, मुली तसेच ऊसतोड कामगारांचे मुले यांना नर्सिंग कोर्सेस शिकण्याची इच्छा असतानाही त्यांची आर्थिक परिस्थीती बिकट असल्यामुळे, त्यांची ऐपत नसल्यामुळे ते शैक्षणिक फीस भरु शकत नसल्यामुळे या कोर्सेसकडे गरीबाची मुले पाठ फिरवल्याचे दिसुन येत आहे.
तरी मा. महोदय तुळजाभवानी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या निवेदनाचा सहानुभुतिपुर्वक विचार करुन महाराष्ट्रातील जीएनएम, एएनएम या कोर्सेसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विमुक्त जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक फिस व इतर फीस मिळवुन देण्यास आपल्या स्तरावरुन योग्य आणि उचित कार्यवाही करावी अन्यथा संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी ही विनंती केली आहे.
0 Comments