तुळजापुर येथे श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमीत्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापुर
तुळजापुर: श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सवनिमीत्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताह वर्ष ७५ झुंजार हनुमान भजनी मंडळ,दिपक संघ तुळजापूर येथे दि ३१ ऑगस्ट पासुन ७ सप्टेंबर पर्यंत सप्ताह असणार आहे.
या सप्ताहाच्या प्रारंभी विना,टाळ,मृदुगांचे गाथा पुजन मुख्याधिकारी कुंभार साहेब,जेष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे,माजी.नगराध्यक्ष सचिन रोचकरी,मा.नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे तसेच दिपक संघ,झुंजार भजनी मंडळातील जेष्ठ सभासद यांच्या हस्ते पुजन झाले. सदरील सप्ताहाचे औचीत्य साधुन दिपक संघ मंळाच्या वतीने समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तर यामध्ये जि धाराशीव(उस्मानाबाद) येथील सह्याद्री ब्लड कँम्प लावण्यात आला सदरील ब्लड कँम्प मध्ये ४० रक्त दात्यांनी रक्तदान करण्यात आले. तसेच झुंजार हनुमान भजनी मंडळ,दिपक संघ यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
उपस्थित मान्यवर सचिन पाटील कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती,रंजीत इंगळे,आण्णाप्पा पवार,अक्षय परमेश्वर,रोहीत पवार,महेश चोपदार,दिनेश क्षिरसागर,महेश नडमने,महादेव रोचकरी,समर्थ पैलवान,योगेश रोचकरी,किशोर रोचकरी,नितीन पैलवान,सतिश हुंडेकरी,गुरुनाथ कंदारे,युवराज पवार,दिलीप सोनवणे तसेच सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हभप नितीन रोचकरी,संजय पैलवान,खंडु महाराज जाधव आदींच्या पुढाकातुन हा कार्यक्रम संपन्न होतं आहे.
0 Comments