Hot Posts

6/recent/ticker-posts

रक्षाबंधनालाच बहिण - भावावर काळाचा घाला, दुचाकी कार अपघातात दोघांचा जागीच अंत

रक्षाबंधनालाच बहिण - भावावर काळाचा घाला, दुचाकी कार अपघातात दोघांचा जागीच अंत

 

अमरावती: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावावर काळाची झडप घातल्याची घटना बुधवारी दि, ३० ऑगस्ट रोजी शिराळा चांदूरबाजार रस्त्यावर घडली. या अपघातात बहिण भावाचा जागेवरच मृत्यू झाला, याबाबत सविस्तर माहिती अशी की नारायण जावरकर हे रक्षाबंधनाच्या निमित्ताने बुधवारी अमरावतीत राहणाऱ्या बहिणीकडे आले होते. बुधवारी दुपारी २.५० वाजण्याच्या सुमारास बहिण रीना यास घेऊन दुचाकीनी निघाले. वलगाव ठाण्याच्या हद्दीत शिराळा चांदूरबाजार मार्गावर एका पेट्रोल पंपा समोर पोहोचल्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या कार क्रमांक Mh-29 AD 4330 ने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातामध्ये दोघाही बहिण भावाचा करून अंत झाला, तर कार मधील तिघेही जखमी झाले.

रीना योगेश तांडीर वय (३५) रा. आनंदवाडी कठोर मार्ग, अमरावती व नारायण देवानंद जावरकर वय (२७) रा. सुपाळा भैसदेही मध्यप्रदेश असे मृत पावलेल्या बहिण भावाची नावे आहेत. अपघात एवढा भीषण होता की, त्यात दोन्ही वाहने चेंदामेंदा झाले परिसरातील नागरिकांनी अपघाताची माहिती तात्काळ वलगावसह चांदूरबाजार पोलिसांना दिली. काही नागरिकांनी गंभीर जखमी बहीण भावाला चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासणी अंति मृत घोषित केले. वलगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत गुन्हा नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू केली.

Post a Comment

0 Comments