राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी,तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापुर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी येथे भव्य दिव्य असा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला यावेळी तामलवाडी टोल नाका नॅशनल हायवे 52 येथे दोन्ही बाजूने शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच शेतकरी वर्ग रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते केंद्र शासनाने कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावलेला हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा 2020 - 21,2021 - 22 व 2023 चा 25% आग्रीव पीक विमा तात्काळ देण्यात यावा संपूर्ण जिल्ह्यामध्ये मागील 22 ते 23 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे तरी संपूर्ण जिल्ह्याला तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अश्या प्रमुख मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव विधानसभा उपाध्यक्ष रुबाब भाई पठाण,प्र विधानसभा अध्यक्ष शिवाजी सावंत,अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक शेख, युवक तालुका अध्यक्ष संदीप गंगणे, शहराध्यक्ष अमर चोपदार, युवक तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे, अमोल पाटील ,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सिकंदर बेगडे,हनुमंत माळी, सतीश माळी, शहाजी नन्नवरे, नजीब काजी, इब्राहिम इनामदार, अलीम शेख, गणेश गुंड, गजानन देशमुख, बबन हेडे, रामेश्वर लाडुळकर, शहाजी लाडुलकर, आप्पा बनसोडे, विनोद साबळे, समाधान देवगुंडे, उमेश पांडागळे असे असंख्य कार्यकर्ते शेतकरी वर्ग उपस्थित होते.
0 Comments