तुळजापुर येथे शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापुर : तुळजापुर शहरामध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन तसेच शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वर्धापन दिन निमित्त दि,१५ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाट्न तुळजाभवानी मंदिराचे व्यवस्थापक तथा तुळजापूर चे तहसीलदार श्री. संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण ५८ रक्तदात्यांनी रक्तदान करत शिबीर यशस्वी पार पाडले. याबद्दल शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन आप्पा साळुंखे यांनी सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले.
यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी अर्जुन आप्पा साळुंखे, विकी वाघमारे, नितीन जट्टे, आलोक शिंदे, वैजनाथ सुरवसे, अभिजीत चिवचिवे, किरण चिवचिवे, गणेश नाईकवाडी, संदीप वाघे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments