Hot Posts

6/recent/ticker-posts

सगळेजण मिळून संपूर्ण जिल्हा व्यसनमुक्त करु - अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत

सगळेजण मिळून संपूर्ण जिल्हा व्यसनमुक्त करु - अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत

नशामुक्त गाव अभियान कार्यशाळेत निर्धार 

पुरुष प्रधान संस्कृती मात्र व्यसनमुक्तीसाठी महिलांचाच पुढाकार !

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव



धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - कोणत्याही व्यसनाचा पुष्परिणाम स्वतःबरोबर कुटूंब व पर्यायाने समाजावर देखील होत आहे. त्यामुळे व्यसनाधीन झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा बाल वयातच म्हणजे विद्यार्थी दशेत प्रत्येक शाळेमध्ये तज्ज्ञ‌ व्यक्तिंच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे धडे देणे गरजेचे आहे. तसेच पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्राम सुरक्षा दल व इतर सर्व नागरिकांना सोबत घेऊन संपूर्ण जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करु असा निर्धार अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दि.२ ऑगस्ट रोजी व्यक्त केला.


धाराशिव नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशामुक्त गाव अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, समाज कल्याण अधिकारी सुर्यकांत भुजबळ, कार्यालयीन निरीक्षक मोहन शिंदे, कार्यालयीन अधीक्षक मोहन चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे, येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ संदीप तांबारे, पल्लवी तांबारे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कॉंवत म्हणाले की, एकीकडे दारुची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये दारूबंदी करण्यात यावी अशा तक्रारी महिलाच मोठ्या करीत आहेत. त्यामुळे दारू बरोबरच गुटखा, तंबाखू व सिगारेट आदी व्यसने भावी पिढीला होऊ नयेत याची खबरदारी घेण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम याबाबत धडे देणे आवश्यक आहे. जर धडे दिले तरच भावी पिढी व्यसनापासून नक्कीच वाचू शकेल असे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असताना देखील दारूबंदीसाठी महिला पुढाकार घेत असल्याचे दुर्दैवी चित्र सर्वत्र दिसून येत असल्याचे सांगत महिला व पुरुष या दोघांनी व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गाव व्यसनमुक्ती करण्यासाठी जर कोणी ऐकत नसेल तर पोलीस आहेतच. आपण सगळे मिळून यावर काम करून त्याचा परिणाम दाखवून देऊच असे आशादायक आश्वासन देखील त्यांनी दिले. तर विलास जाधव महाले की, तंबाखू दारू सिगारेट ही पूर्वीची व्यसने आहेत. तर आता नव्याने गुटखा हे व्यसन फोफावले आहे.‌ सार्वजनिक ठिकाणी थूंकून समाजाचे आरोग्य बिघडविण्याचे काम होत आहे. त्यामुळे गाव व्यसनमुक्त करण्यासाठी स्वतःच्या वर्तनातून धडा घालून द्यावा. तसेच चोर पावलांनी मोबाईलचे व्यसन शिरले असून त्यामुळे झोप व जेवण हिरावून घेतले आहे. ते वापरण्याची आचारसंहिता घालून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तर डॉ राजाभाऊ गलांडे म्हणाले की, व्यसनामुळे स्वतःचे आयुष्य कमी करण्याबरोबरच कुटुंबातील व्यक्तींचे देखील आयुष्य कमी होते. समाजातील व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढलेले असून त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच परंडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष नागटिळक म्हणाले की, नशेच्या आहारी गेल्यानंतर उध्वस्त झाल्याशिवाय नशे बहाद्दरांनी समजत नाही. दारूच नव्हे तर कुठल्याही माध्यमातून अल्कोहोल शरीरात गेले तर त्याचा विपरीत परिणाम होतोच असे सांगत दारूमुळे साध्या वार्डमध्ये २० टक्के व ६० टक्के रुग्ण आसीयुमध्ये उपचार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे परंडा पंचायत समिती अंतर्गत व्यसनमुक्त चळवळ जोरदारपणे सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रास्ताविकात संदीप तांबारे म्हणाले की, धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १६६ गावामध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविला होता. तोच व्यसनमुक्तीचा कार्यक्रम देशातील ३७२ जिल्ह्यात राबविण्यात येत येत असून जिल्ह्याने देशाला दिशा देण्याचे काम केले असल्याचे नमूद केले. तसेच जिल्हा रुग्णालयात ओपीडी मध्ये व्यसनावर उपचार करण्याची सुविधा सर्वप्रथम सुरू केली असून ते काम या संस्थेने अंमलात आणल्या असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे देश नशा मुक्त करायचा असेल तर गावापासून सुरुवात करावी असे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार सूर्यकांत भुजबळ यांनी मानले.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. तर व्यसनमुक्तीची आरती व नाटिका सादरी करण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


व्यसन मुक्तीचे काम करणाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सपोनि दिनकर गोरे, एक.डी. कदम, श्रुतिका हाजगुडे, मच्छिंद्र हुलूळे, गणपतसिंग परदेशी, मारुती बनसोडे, प्रियांका शिंदे, पांडुरंग मते, योगीराज पांचाळ, सुजाता वाघमारे, नानासाहेब देशमुख, श्रद्धा बारकुल, श्रावणी चौधरी, श्रेया बारकुल, ॲड अंगद चव्हाण, अर्चना दराडे, गंगा सातपुते, संतोष नागटिळक, चंद्रकांत उळेकर,  नागनाथ कुंभार, मुरलीधर पाटील यांच्यासह इतरांचा होता.

Post a Comment

0 Comments