तुळजापुर तालुक्यातील वागदरी परिसरात पावसाअभावी पिके धोक्यात, पिके माना टाकू लागली लागली दमदार पावसाची प्रतीक्षा
![]() |
वागदरी येथील अमोल शाहूराज पाटील यांच्या शेतातील पावसाअभावी झालेली सोयाबीन पिकाची अवस्था |
तुळजापुर: तालुक्यातील वागदरी परिसरात जुलै महिन्यामध्ये अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, यानंतर रिमझिम पावसावर पिके तग धरून होती, मात्र गत वीस ते पंचवीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांनी माना टाकले आहेत. परिसरामध्ये खरीप हंगामातील मुख्यता सोयाबीन, उडीद ,मूग ,तुर पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने हिरवीगार दिसत असलेली पिके ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच अनेक ठिकाणी करपू लागलेले दिसत आहेत, लाखो रुपयाचा खर्च करत पेरणी करून हिरवीगार दिसत असलेली पिके अक्षरशा डोळ्यासमोर करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरातील ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाच्या सुविधा नाहीत त्यांचे डोळ्यासमोर पिके वाळत आहेत, ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते पिके वाचवण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळत आहेत.
एकंदरीत यावर्षी खरीप हंगामातील पेरणी तब्बल एक महिन्याने उशिरा झालेली असली तरी जुलै महिन्याचे अखेरपर्यंत पडलेल्या जेमतेम पावसामुळे पीक परिस्थिती बरी होती परंतु त्यानंतर सलग 20 ते 25 दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे वागदरी आणि परिसरातील पिकांची परिस्थिती चिंताजनक दिसून येत आहे.
0 Comments