तुळजापुर : माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्रशालेस भेटवस्तू देऊन साजरा केला स्नेहमेळावा
तुळजापुर : - येथील जिल्हा परिषद प्रशालेत सन २००६ - २००७ च्या इयत्ता १०वीच्या बॅचने स्नेहमेळावा आयोजित केलेला होता. या स्नेहमेळाव्याला आजी माजी सर्व शिक्षक उपस्थित होते . मेळाव्याचा मुख्य हेतू आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच शाळेला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हातभार लावणे.
यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल , भूम येथे मुख्याध्यापक पदी कार्यरत तात्या कांबळे तसेच श्रीमती लक्ष्मी सरडे, प्रविण पडवळ,श्रीमती यमुना देशमुख, भाऊसाहेब जाधव, तस्लीम काजी , चंद्रकांत गावडे , रमेश रेणके , परिचर भुजंग पोतदार हे तत्कालीन बॅचला अध्यापन करणारे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या गुरुजनांचा शाल , श्रीफळ , पुष्फगुच्छ , तुळजाभवानीची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला .
मनोगनात तात्या कांबळे यांनी शाळेचे गतवैभव उभं करणारी
' ते दिवस '
'वाईट वाटते पाहूनी मजला इथली शांतता . ...
एके काळी गोगाटाणे हरवायची इथली शांतता .....
होत्या तुकड्या दोन दोन इथे प्रत्येक वर्गाच्या ...
अनेक स्पर्धा इथे व्हायच्या तालुक्याच्या . :..
शिपाई होते चार पाच इथे संध्याकाळी मुक्कामी एक असायचा .....
दर वर्षी सहल जायची गोंधळ खूप असायचा ....
यायची मुले शाळेत इथे अनेक खेड्याची.....
भरून जायचं मैदान सगळं मुलं तितकी .....
सावधान विश्राम परेड इथे असायची .....
रेणके सरच्या कुंचल्याने निर्जीव चित्रे इथे फळ्यावर इथे नाचायची....
आठवणींचा आहे इथला सुवर्ण खजिना....
नाही संपत सांगू किती दाटतो गळा .....
ही कविता सादर केली. तसेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन IT ,सॉप्टवेअर , सिव्हील इंजिनिअर , वकील तसेच इतर शासकीय नोकरीत गौरवपूर्ण काम करणारी मुलं पाहून अभिमान वाटतो म्हणजे जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेच्या बाबतीत कुठेच कमी नाही असे सांगितले ."
' माजी विद्यार्थी व आजी - माजी शिक्षक यांची सहल आयोजित करून आनंद पुन्हा लुटुया असे आवाहन माजी मुख्याध्यापक भाऊसाहेब जाधव यांनी केले .सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले .
माजी विद्यार्थीनी प्रियंका बंडगर म्हणाली की, " आमच्या वेळी १० वी वर्गाचा पट १०५ होता. शाळेला पुन्हा ते दिवस आणण्यासाठी सर्व शिक्षकांनी आमच्या काळातील शिक्षकांप्रमाणे पालक भेटी घ्याव्यात. शाळेला मदत देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत . " या वेळी या बॅचने मुलींच्या शौचालयासाठी शाळेला पाण्याची टाकी व शैक्षणिक साहित्य भेट दिले.
स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी संजय पवार, उमेश बनसोडे, सिद्धार्थ ढाले, योगेश सुरवसे व इतर अनेक मुलांनी कष्ट घेतले .प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार जाधव व सर्व शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले.
0 Comments