तुळजापुर : प्रा. घाडगे व खुरुद यांचा सेवानिवृत्तीबद्दल सक्तार
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापुर: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य शाखेतील प्रा.छाया घाडगे व ग्रंथालय कर्मचारी गोविंद खुरूद हे वयोमानानुसार सोमवारी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार प्राचार्य प्रा.रवी मुद्खना व प्रबंधिका सुजाता कोळी यांच्याहस्ते सेवानिवृत्त पत्र देऊन करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख प्रदीप हंगरगेकर प्राचार्य रवी मुद्खना यांनी या कर्मचाऱ्याविषयी मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील आयुष्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या .निरोप सत्कारप्रसंगी प्राध्यापिका छाया घाडगे व कर्मचारी गोविंद खुरूद यांनी महाविद्यालयाबद्दल आपले मनोगत व्यक्त करून सर्व सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले व आपल्या सेवा काळातील महत्त्वाचे क्षण विशद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेक गंगणे यांनी केले तर आभार ग्रंथपाल गंगाधर मेथेकर यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक, शिक्षकतेर कर्मचारी व शिपाईवर्ग उपस्थित होते.
0 Comments