Hot Posts

6/recent/ticker-posts

जुन्या वादातून बाप - लेकावर जीवघेणा हल्ला, सात जणांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

जुन्या वादातून बाप - लेकावर जीवघेणा हल्ला, सात जणांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

धाराशिव:  मागील भांडणाच्या कारणावरून तुळजापूर तालुक्यातील घोडके तांडा शिवारात घरात घुसून वडिलांसह मुलावर सात जणांनी सशस्त्र हल्ला करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दिनांक, २३रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी संबंधित सात जणाविरुद्ध नळदृग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की आरोपी बालाजी किसन सुरवसे, लक्ष्मण किसन सुरवसे, अशोक महादेव खोखडे, मारुती एकनाथ सुरवसे सर्व राहणार खुदावाडी , सोपान हरी सावंत, गोविंद ( दोघे रा. चुंगी), डाकू दिलीप गायकवाड, (रा.खानापुर) यांनी जुन्या वादाच्या कारणावरून घोडके तांडा येथील शेतात राहणाऱ्या सुनील नवनाथ दूधभाते व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून तोंडावर मिरची पूड टाकून लाथाबुक्क्यांसह काठी,जंबीया तलवार,आदी शस्ञासह प्राणघातक जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी सुनील दूधभाते यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments