तुळजापुर येथे पालकमंत्री प्रा.डाॅ.तानाजी सावंतसाहेबांच्या हस्ते शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश
तुळजापूर : महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंतसाहेब यांच्या हस्ते सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक युवकांचा दि,९ रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश देण्यात आला.
यावेळी बापूसाहेब भोसले,अभिजीत अमृतराव, धर्मराज पवार माजी नगरसेवक, बार असोसिएनचे अध्यक्ष विधीज्ञ संजय पवार,विधीज्ञ उदयसिंह भोसले,देवसिंगाचे सरपंच देविदास राठोड,मोहन भोसले,स्वाभिमान शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष बिपिन खोपडे,रमेश ननवरे,खंडू कुंभार,देवानंद चव्हाण,निरंजन करंडे,गणेश रोकडे,अभिजीत पाटील,सुरज कोठावळे,निलेश कदम,संजय गायकवाड,अनिल जाधव,कृष्णा घाटे,शाहूराज कोरेकर,राजकुमार कोरेकर,मल्हारी कांबळे, स्वराज कदम,अमोल शिंदे,धनाजी खंडाळकर,पवन कदम, प्रमोद कदम,सचिन विलास धुरगुडे,जेष्ठ शिवसैनिक मनोज मिश्रा, इत्यादी शेकडो कार्यकर्त्यांचा आज जाहीर प्रवेश घेण्यात आला.
पालकमंत्री महोदयांनी पक्षप्रवेशानंतर मंदिरच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी,व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन होणा-या मंदिर विकास आराखड्यातील अनेक चुका निदर्शनास आणून दिल्या,भक्तांनी देविस वाहिलेले दागदागिने गहाळ प्रकरणी चौकशी पुर्ण होताच कोणाला ही पाठीशी घातले जाणार नाही असे प्रसार माध्यमांना सांगितले तसेच भवानी रोडवरती गल्ली समोरील लोखंडी गेट दुचाकी वाहनास खुले करण्याचे आदेश दिले.
यावेळी धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम परमेश्वर,शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनोरे, सुरज महाराज साळुंखे, दत्ता आण्णा साळुंखे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत साहेब, अनिल खोचरे साहेब, प्रा.गौतम लटकेसर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी राजे पलंगेसह आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
0 Comments