Hot Posts

6/recent/ticker-posts

राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत मयत विद्यार्थ्याच्या पालकांस धनादेश सुपुर्द

राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत मयत विद्यार्थ्याच्या पालकांस धनादेश सुपुर्द

धाराशिव:अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांस राजीव गांधी अपघाती विमा योजनेअंतर्गत मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. याकरिता नगर परिषद शाळा क्रमांक 23 या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रयत्न केले होते.

गतवर्षी नगरपरिषद शाळा क्रमांक 23 मधील विद्यार्थी सोमनाथ कालिदास पवार याचे तुळजापूर नाका येथील किनारा हॉटेलजवळ अपघाती निधन झाले होते. या दुर्घटनेनंतर दवाखाना आणि पोलीस स्टेशनमधील संपूर्ण कागदपत्रे काढून राजीव गांधी अपघाती विम्यासाठी शिक्षकांनी पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आले असून मयत सोमनाथ कालिदास पवार याच्या आईच्या नावे 150000 रुपयाचा धनादेश प्राप्त झाला आहे. नगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी वसुधा फड, प्रशासन अधिकारी पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते सोमनाथ कालिदास पवार या मयत विद्यार्थ्याच्या आई-वडिलांचा यथोचित सन्मान करून त्यांना 150000 रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मयत पालकांचा मुलगा तर आपण परत आणू शकत नाही परंतु एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून नगरपालिकेकडून त्याला छोटीशी मदत देऊ शकल्याचा अभिमान शिक्षकांच्या चेहर्‍यावर झळकत होता. यावेळी कर्मचारी संघटनेचे संभाजी राजे,  नगरपरिषद शाळा क्रमांक 23 चे मुख्याध्यापक मारुती देशमुख व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments