शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील ओवाळ यांची बिनविरोध निवड...
![]() |
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील ओवाळ यांची बिनविरोध निवड... |
माळशिरस दि.१४ (प्रतिनिधी): माळशिरस या तालुक्याचे मुख्यालयी,येथील जि .प. प्राथमिक आदर्श कन्या शाळेची नुकतीच, सर्व पालकांच्या उपस्थितीमध्ये, शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन सभा घेण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्वानुमते, पत्रकार,श्री.सुनील संभाजी ओवाळ यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच,शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून सौ .सुजाता सुहास गोखले , स्थानिक प्रतिनिधी सदस्य, श्री दिनेश शिंदे यांची निवड करण्यात आली.नियमानुसार उर्वरित प्रत्येक वर्गातून एक पालक सदस्यांची निवड करण्यात आली.
तसेच यावेळी, शाळेतील सहशिक्षिका श्रीमती. सोनी प्रभाकर कानडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्ती बद्दल शिक्षण प्रेमी सदस्य सौ.सुजाता गोखले यांनी समितीच्या वतीने त्यांचा सन्मान केला.यावेळी उपशिक्षिका श्रीम.राणी सुदाम झुंजरुक यांंचेसह,अनेक पालक उपस्थित होते.
0 Comments