Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीमद् भागवत कथायज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह गाथा मंदिर देहू येथे ह भ प. गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांच्या अमृतजीवनाचा अमृतमहोत्सव अभिष्टचिंतन सोहळा आयोजन

श्रीमद् भागवत कथायज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह गाथा मंदिर देहू येथे  ह भ प. गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांच्या अमृतजीवनाचा अमृतमहोत्सव अभिष्टचिंतन सोहळा आयोजन   

         
नातेपुते प्रतिनिधी : अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा यज्ञ श्री क्षेत्र देहू गाथा मंदिर येथे दि २३ सप्टेंबर ते दि. ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये जेष्ठ किर्तनकार ह भ प. गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले, अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांच्या अमृतजीवनाचा अमृतमहोत्सव. अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त कीर्तन महोत्सव श्रीमद् भागवत कथा प्रवचन माला संपन्न होत आहे श्रीमद् भागवत कथाकार परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज कोषाध्यक्ष  श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या यांची कथा दररोज दुपारी तीन ते साडेसहा या वेळेमध्ये संपन्न होणार आहे ह भ प. देवराम महाराज गायकवाड, ह भ प. सुभाष महाराज गेठे, ह भ प. गोविंद महाराज जाटदेवळेकर, ह भ प. नारायण महाराज जाधव, ह भ प. उल्हास महाराज सूर्यवंशी ह भ प. गुरूवर्य शांतीब्रह्म मारोती बाबा कुरेकर, यांचे प्रवचनसेवा संपन्न होणार आहे तसेच कीर्तन महोत्सव ह भ प अनिल महाराज पाटील, ह भ प बापूसाहेब महाराज मोरे, ह भ प माधवदास महाराज राठी, ह भ प केशव महाराज नामदास, ह भ प श्रीकृष्ण महाराज नवले, ह भ प भास्करगिरी महाराज देवगड, ह भ प जयंत महाराज गोसावी, ह भ प पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, ह भ प श्रीपाद महाराज भडंगे, ह भ प संजय महाराज पाचपोर, ह भ प जगदीश महाराज जोशी, ह भ प जयंत महाराज बोधले, ह भ प संतवीर बंडातात्या कराडकर, यांची कीर्तनसेवा या सोहळ्यामध्ये संपन्न होणार आहे दि २८ सप्टेंबर गुरुवार रोजी,गुरूवर्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, गुरुवर्य मारोती बाबा कुरेकर, गुरुवर्य माधव बाबा घुले, यांच्या हस्ते अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा.असे आव्हान गाथा मंदिर परिवार देहू तथा अमृत महोत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

उपसंपादक: विलास भोसले
⛔बालाघाट न्युज टाइम्स ⛔

Post a Comment

0 Comments