Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा दोन दिवसीय धाराशिव जिल्हा परिक्रमा दौरा

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा दोन दिवसीय धाराशिव जिल्हा परिक्रमा दौरा

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची महाराष्ट्रात दि.४ सप्टेंबरपासून शिवशक्ती परिक्रमा चालू झालेली आहे. या परिक्रमे दरम्यान दि.८ व ९ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.

दि.८ सप्टेंबर रोजी उमरगा तालुक्यातील आलूर येथे दुपारी १.३० वाजता आगमन होणार असून जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य व शहाजी पाटील हे स्वागत करणार आहेत. तर दुपारी २ मुरूम येथे आगमन व राजू मिनियार यांच्या घरी करणार आहेत. तसेच दुपारी ३ वाजता अणदूर येथे आगमन व ३.१० वाजता अणदूर येथे आगमन तर सायंकाळी ५ वाजता तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन तर सायंकाळी ६.३० वाजता परंडा येथे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेणार आहेत. तसेच सायंकाळी ७.३० वाजता धाराशिव येथे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आगमन व मुक्काम करणार आहेत. तर दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व सकाळी १० वाजता परंडा मार्गे करमाळ्याकडे रवाना होणार आहेत.

Post a Comment

0 Comments