Hot Posts

6/recent/ticker-posts

काळा चहा पिणे या सहा आजारावर आहे गुणकारी उपाय|Drinking black tea is effective remedy for these six diseases

काळा चहा पिणे या सहा आजारावर आहे गुणकारी उपाय 


आज आपण या लेखामध्ये काळा चहा मानवी शरीरासाठी किती फायदेशीर आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. आपली जुनी पिढी म्हणजे आपले आजी आजोबा अगदी आपले आई-बाबा काळा चहा प्यायचे किंबहुना बरेच जण अजूनही पितात. मात्र सध्याच्या काळात कटिंग चहा पिणारे लोक दुधाची चहा पिणे जास्त पसंत करताना दिसत आहेत. कारण त्याला तशी खास कारणेही आहेत. काळा चहा हा शरीरासाठी खूप औषधी आणि गुणकारी आहे. हा चहा आणि आजार उपाय ठरू शकतो, काळा चहा हा दिसायला देखील बेरंग किंवा बेचव वाटत असला तरी त्याचे फायदे खूपच चांगले आणि गुणकारी आहेत. आजच्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या धकाधकीच्या जीवनामधील व्यक्तीस हा काळा चहा खूप फायद्याचा ठरू शकतो

पहा कोणते आहेत हे सहा आजार

  1. थकवा आणि अशक्तपणा दूर होतो :Eliminates fatigue and weakness - गावाकडील माणसे जास्त काळा चहा पिण्याची कारण हेच असते की चहातील विशिष्ट घटकामुळे अंगात आलेली अशक्तपणा थकवा दूर होतो व अंगातील आळस निघून जातो. तसेच काळा चहामुळे तुमच्या शरीरातील कार्यक्षमता वाढण्यास मदत होते
  2. मधुमेह :Diabities - मधुमेह हा रोग साधारणता 40 ते 45 वर्षानंतर अनेक लोकांमध्ये आढळून येतो. अशा लोकांना काळा चहा पिण्याने यातील पॉली फेनोल्समुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेत सुधारणा होऊन मधुमेहासारख्या आजाराला लांब ठेवू शकतो.
  3. फुफुसाचा ककरोग Lung cancer- धूम्रपान आणि अन्य व्यसनामुळे फुफुसाच्या कर्करोगावर काळा चहा वरदान ठरू शकतो नियमित काळा चहा पिल्यामुळे कर्करोग टाळता येऊ शकतो.
  4. मुतखडा :Kindeystonte: मुतखडा हा आजकाल अनेक तरुण-तरुणी मध्ये पाहायला मिळतो अशा लोकांनी नियमितपणे काळा चहा प्यायल्यास तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यता आठ टक्के कमी होते.
  5. पोटाचे विकार : Stomach disorders-  आजकाल अनेकांना धकाधकीच्या जीवनामध्ये अयोग्य आहार फूड फास्ट ताण तणाव यामुळे ऍसिडिटीचा त्रास अनेकांना दिसून येत आहे काळा चहा पिल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. तसेच पचनक्रिया सुरळीत होऊन पोटाची विकार कमी होतात उलट्या मळमळ होत असल्यास काळा चहा रामबाण उपाय ठरू शकतो.
  6. हृदयाचे आजार : heart disease - नियमितपणे काळा चहा पिल्यामुळे हृदयाच्या धमन्याची कार्यक्षमता वाढते आणि धरणी आकुंचन पावण्याची शक्यताही खूप कमी होते. त्यामुळे हृदयाशी निगडित आजार कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर या आजारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्ही आजपासूनच काळा चहा पिण्यास सुरुवात करायला काही हरकत नाही .


टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.


Post a Comment

0 Comments