भारतीय किसान संघ तुळजापूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन|
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर
तुळजापुर : राज्यातील शेतकर्यांना दुष्काळ सह्ययता निधी म्हणुन एकरी दहा हजार रूपये व पशुधनासाठी पशुपालन संगोपन अनुदान मनून प्रतिपशु एक हजार रुपये देण्यात यावे भारतीय किसान संघ तुळजापूर तालुक्याच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात खरीप हंगामात अनियमित व कमी पडलेल्या मोसमी पावसाचा अनुभव अभुतपूर्व असा आहे. त्यामुळे खरीप हंगामात केलेल्या कोणत्याही पिकाची खात्री आता देता येत नाही. त्यामुळे येणार्रा रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी सर्व शेतकऱ्यांची आर्थीक कोंडी झाली आहे. राज्यातील शेतकर्यांना दुष्काळ सह्ययता निधी मनून एकरी दहा हजार रूपये व पशुधनासाठी पशुपालन संगोपन अनुदान मनून प्रतिपशु एक हजार रुपये देण्यात यावे. चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून द्यावे.पुढील 12 महिन्यांसाठी जनतेसाठी पाणी व ग्रामीण भागात उपजिविकेसाठी रोजगार निम्रितीसाठी उपाय योजना केल्या जाव्यात.या व इतर मागण्यांसाठी भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.आज मा.तहसीलदार साहेब तुळजापूर यांना वरील मागण्यांसाठी भारतीय किसान संघ तुळजापूर तालुक्याच्या च्या वतीने निवेदन देण्यात आले.हे निवेदन देताना श्री. नितीन घुले(वाशी) जिल्हा संयोजक भारतीय किसान संघ धाराशिव,भूपाल गायकवाड. नानासाहेब पाटील,अमर तांबे उपस्थित होते.
_______________________________________________
0 Comments