श्रीपुर येथील ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण यांच्या पत्रकारितेला पस्तीस वर्षे पूर्ण
श्रीपूर येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पत्रकार बी टी शिवशरण यांच्या पत्रकारितेला उद्या दहा सप्टेंबर रोजी पस्तीस वर्षे पुर्ण होत आहेत त्यांनी मुंबईत दैनिक नवाकाळ दैनिक नवशक्ती मुंबई सकाळ सांज आपल महानगर अंधेरी टाईम्स या वर्तमानपत्रात लिखाण केले तसेच चळवळीतील काही साप्ताहिक नियतकालिक यामध्ये वैचारिक लिखाण केलं आहे सोलापूर जिल्ह्यातील दैनिक संचार दै एकमत यामध्ये बातमीदारी केली आहे त्यांच्या पत्रकारितेला बहर व परिवर्तनवादी वाटचाल अकलूज येथील साप्ताहिक नई गस्त टाईम्स मधून सुरू झाली साप्ताहिक नई गस्त टाईम्स चे ते वार्ताहर उपसंपादक कार्यकारी संपादक व संपादक पदापर्यंत त्यांनी मजल मारली सातत्यपूर्ण लिखाण समाजांतील अन्याय अत्याचार भ्रष्ट प्रवृत्ती वर निर्भीड व सडेतोड लिखाण केल्यानं त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली .
समाजकारण राजकारण सांस्कृतिक आध्यात्मिक वैचारिक परिवर्तनवादी चौफेर लिखाण करुन अनेक समस्या विकासाचे प्रश्न मुलभूत सुविधा गेंड्याच्या कातड्याचे राजकारण यांवर समीक्षात्मक लिखाण केले राजकीय समीक्षात्मक परखड लिखाणाची सर्व स्तरातील वाचकांच्या प्रतिक्रिया व त्यातून शाबासकीची थाप पत्रकार चांद शेख यांनी सुरू केलेल्या साप्ताहिक नई गस्त टाईम्स ला पत्रकारितेच्या क्षेत्रात उंचीवर नेण्याची प्रामाणिक भुमिका निभावली आहे गस्त दिवाळी अंक दर्जेदार व वैशिष्ट्य पुर्ण काढले दिवाळी अंकाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले मुंबई वृत्त दर्शन चा प्रतिष्ठेचा दर्पण पुरस्कार हा सन्मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
अमरावती येथील महानुभाव पंथ यांचा चक्रधर पुरस्कार बार्शी येथील स्वर्गीय सितादेवी सोमाणी प्रतिष्ठान चा पुरस्कार पुणे येथील अंकुर साहित्य पुरस्कार दसूर येथील शिवप्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचा आदर्श पत्रकार पुरस्कार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर आदर्श पुरस्कार लोकनेते राजाभाऊ सरवदे सन्मान पुरस्कार साप्ताहिक बंडखोर यांचे वतीने दलित पँथरचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही दलित पँथर पुरस्कार डीएम जे संघटनेचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या पत्रकारितेला एकशे दोन वर्ष पुर्ण झाले बद्दल मुकनायक सन्मानाने सन्मानीत यांबरोबरच श्रीपूर पत्रकार संघाचे संस्थापक पहिले अध्यक्ष माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष म्हणून पद भूषविले.
आरपीआय आठवले गट श्रीपूर शहर माजी अध्यक्ष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर माजी अध्यक्ष सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ सदस्य पद भूषविले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती माजी अध्यक्ष अशी वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटना यांवर सक्रिय कार्यरत म्हणून काही काळ कामं पाहिले आहे सध्या अनेक वेगवेगळ्या विषयांवर सातत्यपूर्ण लिखाण करत आहे विकासाची व सकारात्मक बातमीदारी करण्याचा प्रयत्न केला आहे साप्ताहिक गस्तपथक चे संस्थापक संपादक म्हणून कार्यरत पत्रकार म्हणून वावरत असताना अनेक संस्था पदाधिकारी नेते कार्यकर्ते अधिकारी यांच्याशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत या सर्व वाटचालीत अनेक आठवणी प्रसंग घटना मित्र नेते कार्यकर्ते सहकारी पत्रकार मित्र यांनी मला समजून घेतलं माझ्यातील चांगल्या लिखाणाची दखल घेतली दाद दिली भ्रष्ट अधिकारी नादान पुढारी कामचुकार लोकप्रतिनिधी व समाजातील अनिष्ट प्रथा रुढी व वाईट गोष्टींवर शब्दांचे आसूड मारले गेले त्यामुळे ते माझ्याकडुन अनेकदा दुखावले गेले पण समाजाच्या गावाच्या हितासाठी भल्यासाठी मी अनेकदा त्यांचे करिता वाईट ठरलो असो मला जेवढं आठवलं तेवढं मनमोकळा संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेल्या पस्तीस वर्षात अनेक घटना प्रसंग आठवणी यांच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे .
शोध पत्रकारिता करताना इंदापूर तालुक्यातील सुरवड येथील खुन प्रकरणाला वाचा फोडली त्यात सात आरोपींना पुणे सेशन कोर्टात सात वर्षे शिक्षा झाली तोंडले बोंडले येथील दलित तरुणाचा खून केल्याचे प्रकरण दाबून त्याचा मृत्यू पाण्यात बुडुन मेल्याचा बनावं आरोपींनी केला होता पण वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे त्यावर प्रकाशझोत करणारे वार्तांकन केले व सत्य वस्तुस्थिती पोलिस अधीक्षक यांचें निदर्शनास आणून दिली त्या आरोपींना माळशिरस न्यायालयाने सक्त मजुरी सात वर्षे शिक्षा दिली नागरीसुविधा विकासाचे प्रश्नांवर लिखाण केल्यानं काही प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे
0 Comments