गणेशउत्सवात आनंदाचा शिधा वाढवणार गोडवा!
धाराशिव: राज्यातील जनतेचा गणेशउत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य शासनाने शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील सुमारे 61 हजार रेशन दुकानामधुन हे शिधा संच वितरित केले जाणार आहेत. पुरवठा विभागाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, या शिधा संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, साखर चणाडाळ, व एक लिटर पान तेलाचा समावेश आहे. या संचाच्या माध्यमातून जनतेचा आनंद द्विगुणित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. राज्यातील सुमारे 61 हजार रेशन दुकानांमधून हे शिधा संच वितरित केले जाणार आहेत. राज्यातील एक कोटी 57 लाख 21000 हजार 629 संच वितरित केले जाणार आहेत.
गेल्या वर्षी राज्यात दिवाळीच्या अनुषंगाने शासनाने शिधा संचाचे वाटप रेशन कार्ड धारक लाभार्थी कुटुंबाला केली होती. मात्र बहुतांश जिल्ह्यामध्ये दिवाळी सण संपल्यावर हे शिधा संच पोचले होते, त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी दुकानदार व लाभार्थी यांच्यात वादाचे प्रसंग उभे ठाकले होते. गत अनुभव लक्षात घेता रेशन दुकानदारांनी लवकरात लवकर हे संच उपलब्ध करण्याची विनंती राज्य पूरवठा विभागाकडे केली आहे. त्यानुसार गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वीच हे संच लाभार्थ्याच्या ,हाती कशी मिळतील यासाठी पुरवठा विभागाकडून नियोजन केले जात आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा गणेशोत्सव काळात आनंदाचा गोडवा वाढणार आहे.
0 Comments