Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र महोत्सवमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नगरपरिषद सज्ज : मुख्याधिकारी - कुंभार

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र महोत्सवमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नगरपरिषद सज्ज : मुख्याधिकारी - कुंभार 


तुळजापुर:   दि.१५ ऑक्टोंबर ते २९ ऑक्टोंबर या कालावधीत संपन्न होत असुन, या यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविक ज्योत प्रज्वलीत करून घेऊन जातात. तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रत्येक कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली कामाची जबाबदारी योग्य रितीने हाताळून या नवरात्रोत्सव येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सज्ज व्हा असे सुचित करुन, भाविकांच्या स्वागतासाठी नगरपरिषद सज्ज असल्याचे उद्-गार मुख्याधिकारी श्री.लक्ष्मण कुंभार यांनी ज्योत प्रज्वलना नंतर उपस्थितां समोर बोलताना व्यक्त केले. भाविकांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तूळजापूर न.प.च्या वतीने भव्य ज्योत प्रज्वलीत करण्यात आली असून, यांचा भाविकांना मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असेही आवाहन यावेळी मुख्याधिकारी श्री.लक्ष्मण कुंभार यांनी केले. कार्यक्रमास वैभव पाठक कार्यालय अधीक्षक, शिवरत्न अतकरे कर निर्धारण अधिकारी, अतुल तोंडरे नगर अभियंता ,अशोक सनगले, नगर अभियंता, दत्ता साळूंके स्वच्छता निरीक्षक, प्रमोद भोजने इ.कर्मचारी उपस्थित होते.  सदर ज्योत नव्याने तयार करण्यात आली असून यासाठी श्री.बापूसाहेब रोचकरी, भांडारपाल यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिनिधी: रूपेश डोलारे तुळजापुर 

Post a Comment

0 Comments