Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉक्टरांनी डॉक्टर पत्नीचा दगडाने ठेचून केला खून

डॉक्टरांनी डॉक्टर पत्नीचा दगडाने ठेचून केला खून, अपघाताचा बनाव केला, पंधरा दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल




नाशिक :नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील डॉक्टर भाग्यश्री किशोर शेवाळे यांचा अपघाती मृत्यू झालेला नसून त्यांची पतीसह सासर्‍याने दगडाने ठेचून हत्या केल्याची फिर्याद नांदगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी भाग्यश्री यांचा पती डॉक्टर किशोर नंदू शेवाळे व त्याचे वडील नंदू राघो शेवाळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे अपघाताचा बनाव उघडकीस आला असून, तब्बल 15 दिवसांनी खुनास वाचा फुटली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार दिनांक 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.30 ते रात्री अकरा वाजेच्या दरम्यान मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाला . या अपघातात डॉक्टर भाग्यश्री मृत्युमुखी पडल्याची माहिती तिचा पती डॉक्टर किशोर शेवाळे यांनी माजलगाव पोलिसांना दिली होती. चाळीसगाव पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद करीत हा गुन्हा नांदगाव पोलिसांकडे वर्ग केला होता.

या घटनेनंतर पंधरा दिवसांनी डॉक्टर भाग्यश्री यांचा भाऊ सचिन कैलास साळुंखे( राहणार तीतरखेडा ,तालुका. वैजापूर) यांनी नांदगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत नमूद केल्यानुसार डॉक्टर भाग्यश्री यांचा तिचे पती किशोर शेवाळे व सासरे नंदू शेवाळे नेहमीच छळ करत असत, दवाखाना बांधण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याची नेहमी मागणी केली जात असे. ही मागणी पूर्ण झाली नाही म्हणून बाप लेकाने संगणमताने डॉक्टर भाग्यश्रीची हत्या केली .

अपघाताचा बनाव करीत डॉक्टर भाग्यश्रीला काचेच्या बाटलीने मारत तिला दगडाने ठेचले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या फिर्यादीवरून नांदगाव पोलिसांनी डॉक्टर किशोर शेवाळे व नंदू  शेवाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, निरीक्षक नितीन खंडागळे, मनोज वाघमारे, संतोष बहाकर तपास करीत आहेत.


आठवड्यात दुसरी घटना

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे आठ दिवसाच्या अंतराने खुनाच्या दोन घटना घडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या सहाय्याने पतीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता डॉक्टरांनीच आपल्या डॉक्टर पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

Post a Comment

0 Comments