अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा , धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल,तुळजापुर तालुक्यातील प्रकरण
धाराशिव: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एका आरोपीस धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे, या प्रकरणात विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी काम पाहिले. आरोपी सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके याला शिक्षा सुनावली आहे. ही घटना 2021 मधील असून याच प्रकरणातील अन्य दोन आरोपी पैकी एका विरोध तपासा दरम्यान पुरावा न सापडल्याने दोषारोपत्रातून त्याला वगळण्यात आले तर अन्य एकाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयातील अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सूर्यवंशी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील एका गावात दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी पीडित अल्पवयीन मुलगी मैत्रिणीकडे वही देण्यासाठी गेल्यानंतर घरी न परतल्याने वडिलांनी याप्रकरणी नळदृग पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. सदर तक्रारीवरून सुरुवातीला अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु प्रकरणाच्या तपासामध्ये पीडितेस आरोपी सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके, मुकेश उर्फ भैया भगवान भोरे, व आनंद शिवाजी घोडके यांनी दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान पीडिता मैत्रिणीकडे जात असताना तिला वाटेत अडवून जबरदस्तीने आरोपी सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके यांच्या घरी नेल्याचे समोर आले.
त्यानुसार या प्रकरणी भादवी कलम 376 (3), 376 (डी), 376 (डीए) ,341,342 सह 34 व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 4 6 8 16 सतरा अन्वे कलम वाढ करून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम .एम .शहा ,व सपोनी एस.बी मोटे यांनी केला. त्यानंतर या प्रकरणात आरोपी सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके, मुकेश उर्फ भैय्या भगवान भोरे यांच्या विरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले तसेच संशयित आरोपी आनंद घोडके यांच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने माननीय न्यायालयात तपासी अधिकारी यांनी सदर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले नाही या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी जगताप यांच्यासमोर झाली .
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आर.एस.म्हेञे यांनी कामकाज पाहिले. यामध्ये पीडीता व वैद्यकीय अधिकारी यांचे अहवाल व त्यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर प्रकरणातील अंतिम युक्तिवाद हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. अंजु एस. शेंडे यांच्यासमोर झाला. यामध्ये महत्त्वाचे पुरावे, सुसंगत साक्ष, व विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 नुसार 20 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार दंड कलम 363 नुसार तीन वर्षे शिक्षा व पाच हजार दंड आणि कलम 342 नुसार सहा महिने शिक्षा व दोन हजार दंड ठोठावला आहे. आरोपीस वीस वर्षे सक्तमजरी व व एकूण 32 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
0 Comments