तब्बल २४ वर्षानंतर घेतला वडिलांच्या खून का बदला खून, डोक्यात रॅाड टाकून माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्यामयत दिलीप रामलाल जोनवाल
जळगाव : दोन दशकापेक्षा अधिक काळापासून तरुणांच्या मनात वडिलांच्या खुनाची आग मनात धगधगत होती. तब्बल 24 वर्षानंतर चुलत भावाच्या मदतीने वडिलांच्या मारेकरी दिलीप रामलाल जोनवाल( वय 51 वर्ष राहणार महात्मा फुले नगर) यांच्या डोक्यात रोड टाकून त्यांची निग्रण हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास काशिनाथ लॉज परिसरात घडली. तब्बल 24 वर्षानंतर वडिलांच्या खुनाचा बदला खुणांने घेतल्याने भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात दोन जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की शहरातील महात्मा फुले नगरात दिलीप जोनवाल हे वास्तव्यास असून ते माहिती अधिकार कार्यकर्ता होते. दसरा असल्याने ते अकलूद येथे जेवणासाठी गेले होते तिथून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घरी येण्यासाठी निघाले शहरातील गरुड प्लॉट परिसरातील क्रांती चौकात दिलीप जोनवाल हे आले असता आदिल दस्तगीर खाटीक, व साजिद सागीर खाटीक दोघे राहणार गवळीवाडा यांनी लोखंडी पाईपने जोनवाल यांना मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जोनवाल यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संग्राम जोनवाल यांचे फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस स्टेशनला कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्तेनंतर संशयित गंभीर जखमी
आदिलच्या मनात वडिलांच्या खुनाच्या बदल्याचा राग होताच, त्याने आपल्या चुलत भावाच्या मदतीने दिलीप जोनवाल यांच्यावर लोखंडी रॅाडने हल्ला केला. त्यांनी रागाच्या भरात त्यांच्यावर इतके वार केली की जोनवाल यांच्या डोक्याचा चंदामेंदा होऊन त्यांचा मेंदू बाहेर पडलेला होता खून केल्यानंतर आदिल हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्यांनीच स्वतःहून पोटावर वार करून घेतल्याची माहिती समोर येत आहे.
खुनाने हादरले भुसावळ शहर
गेल्या महिन्यात भुसावळ चार खून झाली होती यात गुन्हेगार निखिल राजपूत यांच्यासह कंडारी येथील दोघांचा समावेश होता. यानंतर खडका रोड परिसरात एकाचा खून झाला होता या पटपट आता शहरातील मध्यवर्ती परिसरात दिलीप जोनवाल यांचा खून झाल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहरात खून का बदला खून " पॅटर्न "
भुसावळ शहरासह परिसरातील गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनलेला आहे. पोलीस प्रशासनाने अनेक गुन्हेगारांना हद्दपार केली असली तरी देखील गुन्हेगारी कमी झालेली नाही. भुसावळ खून का बदला खुणाच्या अनेक घटना घडल्यामुळे या ठिकाणावरील पॅटर्न तयार झाला आहे. अलीकडच्या काळात कोणाची सुरू असलेली मालिका देखील कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे.
पूर्व वैमान्यातून झाला होता खून
माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप जोनवाल यांनी सन 1999 मध्ये दस्तगीर गफूर खाटीक यांचा खुन्नस बाजी वरून खून केला होता. त्यावेळी आदिल हा चार वर्षाचा होता, तेव्हापासून आदिलच्या डोक्यात वडिलांच्या खुनाच्या बदल्याची आग होतीच. अखेर 24 वर्षानंतर आदिलने त्याच्या वडिलांचा खुनाचा बदला खुणानेच घेतला. हत्ती नंतर पोलिसांनी आदिल खाटीक व साजिद खाटीक या दोघांना अटक केली आहे.
0 Comments