राज्यपालांनी तात्काळ विशेष अधिवेशन बोलावुन मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावावे यासाठी सकल मराठा समाज तुळजापूर तालुका व शहर यांच्यावतीने तहसीलदार मार्फत राज्यपालांना यांना निवेदन
तुळजापूर : मराठा आरक्षणासंबधी सरकार बघ्याची भुमिका घेत आसल्याने सकल मराठा रसत्यावर उतरल्याने कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने राज्यपालांनी तात्काळ विशेष अधिवेशन बोलाऊन मराठा आरक्षण प्रश्न मार्गी यासाठी सकल मराठा समाज तुळजापुर तालुका व शहर यांच्यावतीने तहसीलदार मार्फत राज्यपालांना दि ,३१ रोजी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की ,वरील विषयी कळविण्यात येते की खालील गोष्टीचा गार्भियाने विचार करूण आरक्षण रूपी पेटत असलेला महाराष्ट्र भर वनवा याचे रौद्र रूप धारण होत असल्याने तात्काळ जनभावनेचा आदर करावा.
१ ) सकल मराठा समाजाने आजी माजी राजकीय सर्व पक्ष पुढा याना तुळजापुर गाव बंदी चा निर्णय घेण्यात आला असल्याने एकाही राजकीय पुढा याने शहरात प्रवेश करू नये.
२) मराठा सर्घष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज ७ वा दिवस असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्या करीता तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करावेत,तरी माननिय राज्यपाल महोदयांना विनंती की सर्व राजकीय पक्षांनी मराठा समाजाचा उपयोग करूण मराठा समजाला आरक्षणा साठी दिलेला शब्द न पाळल्याने महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन होत आहेत या मध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान तर होतच आहे त्याचबरोबर सामान्य नागरीकांचे ही हाल होत आहेत त्याच बरोबर शैक्षणिक युवा पिढीवर याचा दुषपरिणाम होत आहे. या करीता राज्यपाल महोदयांनी तात्काळ विषेश अधिवेषण बोलाऊन ४० वर्षा पासुन मराठा समाजावर होत असलेला आरक्षण रूपी अन्याय तात्काळ थाबवावा आवक जावक लिपिकयथा मराठा आरक्षणाचे दुषपरिणाम देशभर उमटतील याची नोंद घ्यावी.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर
0 Comments