विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची- उमाकांत मिटकर
धाराशिव :-विद्यार्थ्यांची प्राथमिक अवस्था ही दगडासारखी असते,शिक्षक त्यांना आकार देऊन विविध कलागुणांनी घडवत देवळात बसवून मूर्तिकार बनवतात.असे प्रतिपादन राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे कार्यरत असलेले उमाकांत मिटकर यांनी केले.
तुळजापुर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा वागदरी येथील श्री.किसन जावळे व श्रीमती सुषमा सांगळे यांच्या बदलीनिमित्त वागदरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार व निरोप समारंभ आयोजित केला होता. श्री जावळे व श्रीमती सांगळे या दोन शिक्षकांनी वागदरी शाळेत चार वर्षे सेवा दिली. शाळेच्या प्रगतीत या दोघांचाही महत्त्वाचा वाटा आहे.सहशालेय उपक्रम,शाळा सुशोभीकरण, गुणवत्ता,क्रीडा,विज्ञान,ई विषयात त्यांनी सातत्य ठेवले त्याशिवाय गावातील अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग रहायचा.
प्रत्येकाचे डोळे ओले करणाऱ्या या उपक्रमाचे नेटके नियोजन शिक्षक व मुलांनी केले होते.दोन्ही शिक्षक,ग्रामस्थ, मुले यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व ग्रामस्थांच्या वतीने दोघांचाही भला मोठा हार,फेटा,शाल,प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील मुले-शिक्षकवृंद व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लोहार सर यांनी तर आभार मुख्याध्यापिका श्रीमती जत्ते मॅडम यांनी मानले.
0 Comments