नवीन लातूर- पुणे इंटरसिटी सुरू खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्यास यश.
धाराशिव : धाराशिव व लातूर येथील रेल्वे प्रवाशांची हेळसांड लक्षात घेता खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि. 8/10/2020 रोजी पश्चिम विभागीय रेल्वे बोर्डाच्या बैठकीमध्ये मागणी केली होती तसेच दि. 12/03/2020 रोजी अर्थसंकल्पीय अधीवेशनामध्ये लातुर-धाराशिव-पुणे इंटरसिटी सुरु करणेबाबत मागणी केली होती सदर मागणीच्या अनुशंगाने रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता तसेच मा. रेल्वे मंत्री महोदय यांचे भेठ घेऊन सदर रेल्वे गाडी सुरु करणे बाबत विनंती करण्यात आली होती.
रेल्वे मंत्रालयकडून लातुर- धाराशिव – पुणे रेल्वे क्रं.01437 सुरु करण्यात येत असुन सदर रेल्वे गाडी उदया पासुन धाराशिव व लातूरकराच्या सेवेत सुरु होत आहे. लातूर धाराशिव पुणे ही रेल्वे गाडी लातूर येथुन पुणे करीता दरोज दुपारी 3 वा निघेल धाराशिव येथे दुपारी 4 वा पोहचून सायंकाळी 6 व पुणे स्टेशन येथे पोहचेल तसेच पुणेहुन लातुर करीता ही गाडी सकाळी 6 वाजता सुटेल सदर रेल्वे गाडीचा विद्यार्थी नोकरदार व प्रवाशाना लाभ होणार आहे. दिवाळी दसरा सणाच्या मुहुर्तावर सदर रेल्वे गाडी सुरु झाल्याने नागरीकांमधुन आंनद होत आहे.
0 Comments