Hot Posts

6/recent/ticker-posts

२०२४ पर्यंत निरा—देवधरचे पाणी माळशिरस तालूक्यात येणार :

२०२४ पर्यंत निरा—देवधरचे पाणी  माळशिरस तालुक्यात येणार : रणजितसिंह नाईक निबांळकर

नातेपुते प्रतिनिधी : अनेक वर्षे रखडलेला आणि दुष्काळी भागासाठी महत्त्वपूर्ण असलेला नीरा-देवधर प्रकल्प राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्टची शिफारसही करण्यात आली आहे. यासाठी ६० टक्के निधी केंद्राचा मिळणार आहे. यामुळ प्रकल्प मार्गी लागणार असल्याने माळशिरस तालूक्याला२०२४अखेरीला  पाणी येणारच असे प्रतिपादन माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी कोथळे तालुका माळशिरस येथे सांगितले.

कोथळे ता.माळशिरस येथे निरा देवधर प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त कोथळे येथील खाम्बलिंग मंदिरात ते बोलत होते,सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालूक्यात नीरा-देवधर हा प्रकल्प राहीलेल्या बारा  गावाच्या समावेशासह गावांना पाणी मिळणार आहे. कोथळे या ठिकाणी पाईप लाईनव्दारे,तसेच कन्हेर याठिकाणी बंद कालव्याव्दारे पाणी देण्यात येणार आहे.यावेळी फडतरी,कोथळे,पिंपरी या गावांच्या शेतकरीवर्गानी आपल्या अडचणी सांगितल्या.

यावर्षीच्या अखेरपर्यत  प्रकल्प टेंडर प्रोसेस होऊन काम सूरू होणार असुन क्षमता असलेल्या धरण प्रकल्पांना केंद्राने उपलब्ध करून दिल्याने प्रत्यक्षात निधी उपलब्ध होणार असल्याचे खासदार नाईक निंबाळकर यांनी सांगितले यावेळी राष्टवादीचे नेते उत्तमराव जानकर, जिल्ह नियोजन समिती सदस्य के.के.पाटील, भाजपा नेते हनुमंत सूळ, जिल्ह उपाध्यक्ष सोपान नारनवर, नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, जिल्ह उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, सांगोला विस्तारक हनुमंत कर्चे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, पांडुरंग वाघमोडे, गौतम माने, संजय देशमुख, दादासाहेब खरात, शिवराज पुकळे, भुजंगराव शिंगाडे, बाजीराव माने, पांडुरंग देशमुख, अमर मगर कोथळे येथील ग्रामस्थ  उपस्थित होते.

लोकसभा निवडणूकीत जनतेला दिलेला शब्द खाऱ्या अर्थाने पूर्ण करण्यात आज यशस्वी झालो,निरा देवधर,प्रकल्पासाठी दिल्लीत बैठक झाली.यामध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्यावतीने प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय झाला,तसेच प्रकल्प प्रधानमंञी कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.त्यामूळे केंद्राचा ६०%निधी उपलब्ध होणार आहे : रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार

Post a Comment

0 Comments