Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे राजकीय पुढार्‍यांना गावबंदी, मतदानावर बहिष्कार

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे राजकीय पुढार्‍यांना गावबंदी, मतदानावर बहिष्कार 
चिवरी: जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार व कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर केली आहे. याबाबत चिवरी ग्रामपंचायतमध्ये दि,२७ रोजी राजकीय पुढार्‍यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला आहे. गावच्या वेशीवर राजकीय पुढार्‍यांना प्रवेशबंदी असा फलक लावण्यात आला आहे. मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी गावामध्ये एकही राजकीय पुढार्‍यांना प्रवेश देणार नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून गावच्या फाट्यावर प्रवेश बंदीचे फलक लावले आहे. यावेळी सकल मराठा समाज बांधव, ग्रामस्थ  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments