Hot Posts

6/recent/ticker-posts

एकच मिशन मराठा आरक्षण चिठ्ठी लिहून धाराशिव जिल्ह्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या-maratha reservation young suside

एकच मिशन मराठा आरक्षण चिठ्ठी लिहून धाराशिव जिल्ह्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धाराशिव:  राज्यभरात मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची धग धुमसत असताना याची पडसाद आता गंभीर वळणाकडे जात असल्याचे दिसत आहे. आरक्षण मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील निपाणी येथे आरक्षणाचा बळी गेला असून प्रवीण काकासाहेब घोडके वय 38 वर्षे या युवकाने स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दिनांक 25 रोजी दुपारी घडली आहे. प्रवीण हा मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय सदस्य होता.

राज्यभरात सध्या मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे राहिले आहे. आरक्षण मिळाले तर येणाऱ्या पिढीची प्रगती होईल यासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भावना मराठा समाज बांधवाची आहे. भूम तालुक्यातील निपाणी येथील प्रवीण घोडके या युवकाने बुधवारी दुपारी टोकाचे पाऊल उचलत आरक्षणाच्या मागणीसाठी आपले जीवन संपवले. प्रवीण यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली असून त्यामध्ये एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा आढळल्या आहेत. प्रवीण याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली ,वडील असा परिवार आहे.प्रवीण यांच्या वडिलाकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे,घोडके कुटुंबाचे एकमेव साधन शेतीच आहे. प्रवीण यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबाचा आधार हिरावला आहे वृद्ध सासऱ्यासह तीन अपत्त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आता प्रवीण यांच्या पत्नीवर आली आहे.

धाराशिव  जिल्ह्यामध्ये या अगोदरही मराठा समाजातील दोघांनी जीवन संपवले असून तीनच दिवसापूर्वी परंडा येथील पोलीस हवालदाराने विष प्राशन केले होते.


Post a Comment

0 Comments