नरकचतुर्दशी आणी लक्ष्मीपुजन
=================
आज नरकचतुर्दशी आणी लक्ष्मीपुजन एकत्र आलेत.दर वर्षी नरकचतुर्दशी व दुसर्या दिवशी लक्ष्मीपुजन असा सोहळा असतो.
नरकचतुर्दशी म्हणजे पहाटे उठुन लवकर अभ्यंगस्नान केले जाते.नरकासुर नावाचा राक्षस होता.तो स्रीयांवर अत्याचार करायचा,प्रजेवर अन्याय करायचा,सोळा हजार बायका त्याने बंदी केल्या अशी ही कथा प्रचलित आहे.या बंदीवान स्रीयांना श्रीकृष्णाने मुक्त केले.आणि नरकासुराचा वध केला.म्हणुन आज नरकचतुर्दशी.त्याच्या स्मृतीप्रितर्थ आज पहाटे अभ्यंगस्नान करतात.सुंगधी उटणं,तेल,अंगाला लावुन मालिश करायची आणि गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करायची.सुर्याद्यापुर्वी आंघोळ करायची,जो अशी आंघोळ करणार नाही तो नरकात जाईल अशी समज आहे.
आमची आई आजपण ही प्रथा पाळते.आम्हांस आज ही अभ्यंगस्नान घालते.बालपणी सुगंधी उठणं कुठल मिळायचं,त्याऐवजी तेल लावुन त्यावर बेसन लावल जायच.चांगली माॅलिश केली जात.त्यानंतरअंगावरची मळी काढली जात.केवळ अंगावरची नाही तर मनावरची ही मळी काढा.इतरांच्या बद्दल राग,द्बेष,मत्सर काढा अशी शिकवण दादा म्हणजे आमचे वडिल सांगायचे.नंतर गरम गरम पाण्याने आंघोळ घातली जायची.मोती साबण लावल जायच.गरिबी असल्यामुळे सुगंधी उठणं,साबण,अत्तर कधी मिळाली नाहीत.पण दिवाळीला आवर्जुन या साबणाने आंघोळ करायला आवडत असे.पहाटेच्या आल्हाददायी गारव्यात चुलीवर पाणी तापण्यासाठी हंडा असे.त्याखाली आम्ही भावंड लाकड घालत असु.चुलीत लाकडे घालणे,शेकोटी करणे यात मजा वाटायची.नंतर आंघोळ झाली की आंघोळीच्या ओट्यावरच आई औक्षण करायची.कणिकेचे दिवे लावुन डाव्या बाजुन उजवीकडे तर दुसरा प्रज्वलित दिवा उजवी कडुन डावीकडे औवाळुण ठेवला जात असे.ईटा पिडा टळो,उदंड औक्ष लाभो यासाठी आई प्रार्थना करायची.नंतर दिव्यांनी औक्षण,कपाळालां सोनं लावल जायच,सुपारी लावुन कुंकुमतिलक लावला जायचा.औक्षण करुन साखर खायला दिली जायची.किती निरागस हा संस्कार आणि संस्कृती आहे.घरातील मायमाऊली घरातील सर्वांचे औक्षण करते,उदंड आयुष्याची प्रार्थना करते.सदैव राबणारे हात,सदैव घरासाठी कष्ट करणारी मायमाऊली कसलीच अपेक्षा न ठेवता सतत राबत असते.खरी दिवाळी,खरा आनंद स्रीयांच्या जीवनी येत नाही.सेवा करण हेच स्रीयांच जीवन बनत.स्रीयां कुंटुंबासाठी आणि परिवारातील सदस्यांच्या आनंदासाठी राबतात.त्यांच्या ही जीवनात,आयुष्यात सुखाची बरसत व्हावी,त्यांना सुख,आरोग्य मिळावी अशी दिवाळी साजरी करु. नंतर एकत्र फराळ केला जायचा.त्यात आनंद होता,प्रेम होत.
आमवस्याच्या संध्याकाळी लक्ष्मीपुजन केले जाई.आज लक्ष्मीपुजनाचा दिवस.घर,अंगण स्वच्छ करुन लखलखित केली जात.झेंडु,आंब्यांची तोरण,यांच्या माळा घरी बांधली जात असत.लक्ष्मी ची पुजा अर्चना केली जात.फुलांचे हार,लाह्या,बत्तासे,अगरबत्ती,धुप,दिप,शंख,चक्र,समई,दिव्यांच पुजन होई.घंटी,कुबेर पुजन,झाडु,केरसुनीचं पुजन केल जात असे.फटाके फोडले जायचे.मोठ्यांना पानसुपारी देवुन फराळ वाटप व्हायचा.दिवाळी समृध्द व्हायची.माणसांच्या भेटी गाठी व्हायच्या.प्रेमाने माणस एकत्र यायची.
आज सार झगझगित दिसत.व्हाटसअप,फेसबुक,इंस्टाग्रामवर,टिकटाॅकवर हल्ली शुभेच्छा दिल्या जातात.शुभेच्छाचा ढिग साचतो.फराळ ही हल्ली सोशल माध्यमावरच पाठवला जातो.जगण आभासी होत आहे.माणस आभासी वागत आहेत.भेटण,बोलण,फराळ एकत्र करण सार संपत आल.स्पर्धेच्या युगात कोणाला एकमेंकासाठी वेळ नाही.पैसा जास्त झाला,अहंकार पण जास्त आला.सार पैशांत मोजल जात.पैशाने नाती,शुभेच्छा,फराळ मोजला जात आहे.शाॅपिंग,डिनर,लंच,हाॅटेलिंग,मी आणि माझी बायको मुल एवढी छोटी दिवाळी होत आहे..नोकरदार,चाकरमानी तर आईवडिल यांना ही सांभाळायला तयार नाहीत.दिवाळीत दोन भाऊ एकत्र फराळ करत नाही.लक्ष्मीपुजनाला,संपत्ती,श्रीमंतीचं पुजन करणारी माणसं जेंव्हा माणुसकीच प्रदर्शन करतील,तेंव्हा खर लक्ष्मीपुजन होईल.शहरातील जीवन तर प्रचंड धकाधकीच आणि सुसाट झाल.प्रेम,माणुसकी शहरापेक्षा खेडेगावात आज जपली जाते.पण बदलायला हव.माणसच ही पुजन व्हावं.गरिब माणसाला कपडे,फराळ दिला जाईल,कुंटुंब एकत्र येतील,प्रेम वाढेल तेंव्हा खरी लक्ष्मी समृध्द होईल.नाहीतर करोडो रुयांच्या बंगल्यात लाखो रुययाची गाडी ,सोनं,पैसा सर्व सुख आहे पण उद्या चालुन आम्ही जस आमच्या आईवडिलांना दुर केल तस आपली मुल ही आपली सोय अडगळीच्या खोलीत करतील.म्हणुन आपण संस्कृती जोपासताना संस्कारही जोपासुयात.चांगली पिढी निर्माण करताना चांगल बनण्याचा प्रयत्न करु,खरी लक्ष्मी श्रीमंत घरी नसते तर ती संस्कारित घरात नांदते.आणि संस्कारशिल घरातच खर लक्ष्मीच नैतिक,संस्कारिक पुजन होत.बाकी श्रीमंत घरी तर अंहकार रुपी लक्ष्मी सतत नांदत असते जी तुमच्या डोळ्यावरचा अंहम पडदा दुर होवु देत नाही.बस लक्ष्मी पुजनानिमित्ताने सर्वांच्या जीवनात सुखः,समृध्दी,आनंद,आरोग्य यावे,खरी माणुसकी रुपी लक्ष्मीचा वास अखंड राहो या शुभेच्छा!
तमसो मा ज्योतीर्गमय
ही दिवाळी आपणास अंधाराकडुन प्रकाशाकडे घेवुन जाईलच त्याबरोबर अविवेक,अंधश्रध्दा,यांचा अंधार नष्ट होवुन विवेकाचा प्रकाश देईल हिच लक्ष्मी चरणी कामना!
वर्धिष्णु भव!
==================
©
आपलाच गुरुजी
श्री.पंकज राजेंद्र कासार काटकर
मु.पो.काटी.ता.तुळजापुर
जि.धाराशिव
मो.नं.÷९७६४५६१८८१
0 Comments