बा विठ्ठला पांडुरंगा, प्रबोधनी एकादशी विशेष कविता
==================
बा विठ्ठला पांडुरंगा
दर्शन दे आता बा विठ्ठला
सावळे रुप तुझे देवा
किती गुण वर्णु बा विठ्ठला ॥१॥
वाळवंटी नांदतो तु देवा
माऊली माऊली जयघोष तुझा
देवा वारकरी मी सदैव पाडुंरंगा
बा विठ्ठला दास देवा तुझा ॥२॥
एकादशी दिनी तुझे दर्शन व्हावे
माझा मी न राहे देवा पांडुरंगा
तुझा चरणी माझे चित्त राहु दे
तिनी लोक तुच देवा पांडुरंगा ॥३॥
उपवास तुझा नित्य मनी आहे
ध्यास तुझा रे मनी वसे विठ्ठला
बा विठ्ठला पांडुरंगा दर्शन दे आता
भाव तुझा चरणी वाहिला विठ्ठला ॥४॥
रुक्मीणी संगे नांदे तु विठ्ठला
अठ्ठावीस युगे पंढरी तु वाळवंटी
भक्ता साठी पाडुंरंग उभा विटेवरी
परब्रह्म गा माझा तु वाळवंटी ॥५॥
तुझा दर्शनाने पापाचे होती पुण्य
विरक्ती येता रे जीवनी झालो धन्य
तुझा नाद लागो सदैव या चित्ता
दर्शन होता विठ्ठला झालो धन्य ॥६॥
====================
श्री.पंकज रा.कासार काटकर
काटी .ता.तुळजापुर.जि.उस्मानाबाद
मो.नं.-९७६४५६१८८१
0 Comments