Hot Posts

6/recent/ticker-posts

⭕ मुखी नाम माझे विठ्ठल,प्रबोधनी एकादशी विशेष कविता

⭕ मुखी नाम माझे विठ्ठल,प्रबोधनी एकादशी विशेष कविता 


=========================


मुखी नाम माझे विठ्ठल

चालतो पंढरीची वारी

मुखी माझ्या गातो अभंग

कधी न चुकावी माझी वारी  ॥१॥


हरी हरी नाम घ्यावे

मुखी सदा विठ्ठल बोलावे

सदा सुखी मी असावे देवा

तुझा चरणी मी सदैव राहवे  ॥२॥


पांडुरंग माझा देव पंढरीसी

चंद्रभागा वाहे नित्य पंढरी

तिथे नांदतो देव माझा हरी

ही आहे सोन्याची माझी पंढरी ॥३॥


भगवी पतका माझ्या खांद्यावरी

पायी वारी करतो देवा तुझी

तुझा आशिष सदैव असाच राहो

वारी आषाढी कार्तिकी व्हावी तुझी ॥४॥


रुक्माई माझी आई विठ्ठु माझा बाप

चंद्रभागे तिरी नांदतो माझा सावळा हरी

तुझा भक्तीचे किती गुण मी वर्णावे

माझ्यात मनात नांदे  हा सावळा हरी  ॥५॥


विठ्ठल विठ्ठल बोलता मनी धन्य पावला

वारकरी माझा भक्तीत न्हाईला

तुझा चरणाची नित्य घडो सेवा

तुझाच चरणी देवा भाव हा वाहिला ॥६॥


===================================

          श्री.पंकज रा.कासार काटकर

            मु.पो.काटी.ता.तुळजापुर

                 जि.उस्मानाबाद

             मो.नं.÷९७६४५६१८८१

Post a Comment

0 Comments