महामानव क्रांतीसुर्य म.फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कविता
===============================
शिक्षणाची पहाट आणली माझ्या बापाने
बहुजनांना मुक्त केले माझ्या बापाने
महात्मा फुले माझे आहेत दैवत
समता स्वातंत्र्य याचे खरे दैवत
गुलामगिरी आमची मुक्त झाली
स्री साहित्याची नविन पहाट आली
पडदा पध्दती दुर केली महात्म्याने
विधवांना पुर्नरविवाह हक्क दिला क्रांतीसुर्याने
स्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली पुण्यात
मुक्त झाली हो गुलामगिरीतुन स्री देशात
सतीप्रथा हो दुर केली माझ्या महात्म्याने
स्री स्वातंत्र्याची सुरुवात केली क्रांतीसुर्याने
ब्राह्मणांचे कसब ,शेतकर्याचा आसुड लिहिला महात्म्याने
गुलामगिरी आणि अस्पृश्यांची कैफियत मांडली महात्म्याने
दलितासाठी पाण्याचा हौद खुला केला
समतेचा खरा मार्ग दाखविला
केशवपण बंद केले क्रांतीसुर्याने
सत्यशोधक धर्म दिला महामानवाने
मानवतेचा खरा उध्दारक माझे क्रांतीसुर्य
नमन माझे हो महामानव म.फुल्यांस
________________________________________
महामानव क्रांतीसुर्य .म.फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष कविता
माझी हायकू रचना
विषय ÷ क्रांतीसुर्या
🟥🟥🟥🟥🟩🟩🟩🟩🟥🟥🟥🟥🟩🟩🟩🟩
हे क्रांतीसुर्या
महा मानवा नमो
हे ज्ञान सुर्या॥१॥
हे क्रांतीसुर्या
शिक्षण ज्ञान यज्ञा
हे नमो सुर्या ॥२॥
हे क्रांतीसुर्या
उध्दारक तू ज्योती
समाज आर्या॥३॥
हे क्रांती सुर्या
हे दलितोध्दारका
हे महासुर्या॥४॥
हे क्रांतीसुर्या
समता मानवता
सत्याच्या सुर्या॥५॥
हे क्रांतीसुर्या
शेतकरी उध्दारा
स्री मान सुर्या॥६॥
_____________________________________________
श्री.पंकज रा.कासार काटकर
मु.पो.काटी.ता.तुळजापुर
जि.धाराशिव
मो.नं÷ ९७६४५६१८८१
0 Comments