तुळजापुर तालुक्यातील बारूळ शिवारातून विहिरीवरील पाणबुडी मोटार लंपास, तुळजापुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद
तुळजापुर : तालुक्यातील बारूळ शिवारातील शेतातील विहिरीवरील पाणबुडी मोटर चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दिनांक 20 रोजी रात्री घडली आहे, यामुळे बारूळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी फिर्यादी महेश दादाराव देवकते राहणार (बारूळ) सध्या वास्तव्यास मुक्काम औंध पुणे यांच्या बारूळ शिवारातील शेतातील विहिरीवरील पाच एचपी ची पाणबुडी मोटर किंमत पंधरा हजार सहाशे रुपयाची चोरट्याने दिनांक 19 ते 21 नोव्हेंबर च्या दरम्यान लंपास केली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments