एसटी चालविताना मोबाईलवर बोलणे पडणार महागात
मुंबई: राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते, याचाच एक भाग म्हणून एसटी चालक वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. या संदर्भात चालकांना वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना करण्यात आले आहेत. तसेच यासाठी भरारी पथक लक्ष ठेवणार आहे.
राज्य परिवहन महामंडळ विविध उपक्रम राबवत आहेत, मध्यंतरी डबघाईला आलेली एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी यात्रा स्पेशल ,सहली, देवदर्शन दिवाळी, गणेश उत्सव अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. तसेच मागील वर्षापासून 75 वर्ष वरील महिलांना मोफत प्रवास, त्याशिवाय इतर सर्व महिलांना 50 टक्के प्रवास भाडे, अपंग व विशेष यासह इतर योजनांमधून एसटी महामंडळ आर्थिक स्थिती सुधारत आहे.
प्रवाशांना एसटीचा प्रवास सुरक्षित वाटत असतो, त्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी यापुढे एसटी चालक वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. एसटी बस वाहन चालविताना मोबाईल बोलत असला तर, अपघात घडण्याची शक्यता असते. त्याला आळा घालण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाकडून चालकांना सूचना देण्यात आले आहेत.
एसटी चालकाचा वाहन चालवतानाचा मोबाईलवर बोलतानाचा, फोटो आणि व्हिडिओ एसटीतून प्रवास करणारे प्रवासी वरिष्ठांना पाठवू शकतात त्यामुळे अशा प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकावर वचक बसण्यास मदत होणार आहे .
0 Comments