⭕आवडे मज विठ्ठल दर्शन,प्रबोधनी एकादशी विशेष कविता
श्री.पंकज रा.कासार काटकर
मु.पो.काटी.ता.तुळजापुर
जि.धाराशिव
=======================
आवडे मज विठ्ठल दर्शन
वारी माझी सफल होवु दे
तुझा दर्शनाने पवित्र हे मन
जीवन माझे हे सफल होवु दे ॥१॥
ही आस लागली दर्शनाची
तुझा सेवेचा लाभ मज होवु दे
मज आवडे सुगंधी माती पंढरीची
जीवन माझे सार्थकी देवा लागु दे ॥२॥
रुक्माई सजली विठ्ठु संगे माझा
संसार वाळवंटी तिरी माझा फुलु दे
प्रसाद माझा अभंग आहे देवा
भजनात तुझीच सेवा रे होवु दे ॥३॥
गातो नित्य नाम गोडीने देवा तुझे
ही वाचा तुझा नामाने शुध्द होऊ दे
नाचवतो वाचेवर अभंग विठ्ठला तुझे
माझा हा आनंद स्वर्गिय होवु दे ॥४॥
वारकरी विठ्ठला तुझाच आजन्म मी
वारी माझी सात जन्म अशीच होऊ दे
वाळवंटात रंगलो भजनात आजन्म मी
तुझे दर्शन बा पांडुरंगा असेच होऊ दे ॥५॥
माऊली माऊली हे गुण गाता देवा
तुझी सावली ही मजवरी राहु दे
कार्तिक वारी माझी होऊ दे देवा
तुझा कृपेचा आर्शीवाद मजवरी राहु दे ॥६॥
===================================
श्री.पंकज रा.कासार काटकर
मु.पो.काटी.ता.तुळजापुर
जि.उस्मानाबाद
मो.नं.÷९७६४५६१८८१
0 Comments