Hot Posts

6/recent/ticker-posts

19 वर्षाखालील धाराशिव जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणी मंगळवारी

19 वर्षाखालील धाराशिव जिल्हा क्रिकेट संघाची  निवड चाचणी मंगळवारी

 धाराशिव  : 19 वर्षाखालील महाराष्ट्राचा क्रिकेट संघ निवड पूर्व इन्विटेशन मॅचेस करिता धाराशिव जिल्हा संघ निवड चाचणी मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता पासून येरमाळा-बार्शी रोडवरील शिराळा येथील मैदानावर होणार आहे .

या निवड चाचणीत 1/09/2005 या तारखेनंतर जन्मलेल्या मुलांना सहभाग घेता येईल. निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आधार कार्ड, जन्म दाखला, जन्मतारखेचा पुरावा म्हणून निर्गम उतारा  आवश्यक आहे. निवड चाचणीसाठी खेळाडूंनी येताना स्वतःचे क्रिकेट किट घेऊन येणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी रिहाज शेख (92 84 53 87 03) व युवराज पवार (99 21 89 79 65) यांच्याशी संपर्क साधावा .जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव दत्ता बंडगर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments