Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव तालुक्यातील सांजा येथील शेतकऱ्यांचे शेतीला दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव तालुक्यातील सांजा येथील शेतकऱ्यांचे शेतीला दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



धाराशिव : सध्या थंडीचे दिवस चालू असून तसेच रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा धोका व शेतीपंपासाठी वीज वितरण कंपनीकडून सांजा गावातील शेतकऱ्यांसाठी रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत विज दिली जात आहे रात्रीची वीज दिल्यामुळे पशुधनासाठी पाणी भरून ठेवणे असेल किंवा शेतामधील पिकांना पाणी देणे असेल  शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून ही सर्व कामे अंधाऱ्या रात्रीच करावे लागत आहेत त्यामुळे दिवसा चार तास व रात्री चार तास शेतीसाठी वीज मिळावी यासाठी सांजा गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे .त्यामुळे साहेब शेतीसाठी रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज द्या म्हणण्याची वेळ सांजा गावातील शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.

या दिलेल्या निवेदनावर माजी उपसरपंच संजय सूर्यवंशी,भुजंग सूर्यवंशी,दिलीप सूर्यवंशी, मुकुंद सूर्यवंशी,प्रकाश सूर्यवंशी,प्रभाकर सूर्यवंशी, अंकुश सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी,शिवराम कोळी,सदानंद सूर्यवंशी,जीवन सूर्यवंशी,संदिपान सूर्यवंशी,राजकुमार माळी,श्रीराम सूर्यवंशी,सचिन साबळे, सुरेश सूर्यवंशी, धनंजय शिंदे,धर्मराम सूर्यवंशी,अनंत मोरे,वैभव सूर्यवंशी,सुनिता सूर्यवंशी, मुकुंद सूर्यवंशी, नागेश शिंदे, विकास सूर्यवंशी, नागेश हंगरगेकर, राजेंद्र श्रीखंडे, वसुदेव सूर्यवंशी आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.











_____________________________________________________
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बालाघाट न्युज टाइम्स या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा

👇👇👇👇👇👇👇👇


Post a Comment

0 Comments